आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: अाई बहिणीनेच दिली व्यसनी तरुणाच्या खुनाची सुपारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक रोड - आई-वडिलांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या व्यसनी तरुणाच्या खुनाची सुपारी त्याची अाई बहिणीनेच दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली अाहे. अवघ्या ४० हजार रुपयांसाठी संतोष यादव पाटील (वय ३८) याला संपवण्यात अाल्याचेही स्पष्ट झाले अाहे. नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष ऊर्फ पप्पू मद्याच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता. याबाबत त्याची आई बेबीबाई बहीण मनीषा विनायक पवार यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या. मात्र, उपनगर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतोषच्या नेहमीच्या जाचाला वैतागलेल्या बेबीबाई मनीषा यांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी संतोषचा मावसभाऊ गणेश बाळासाहेब ढमाले याच्यामार्फत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाला खुनाची सुपारी देण्याचे ठरविले; मात्र त्याने नकार दिला. तेव्हा ढमालेने संजय पंढरीनाथ पाटील (सम्राटनगर, जेलरोड) सुधीर सखाराम खरात (सम्राटनगर) यांना ४० हजार रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणला. 
 
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस प्रकाश आरोटे यांच्याकडे गुप्त बातमीदारांनी केवळ एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक निरीक्षक मंगेश मसगर यांनी गुन्ह्याचा तपास करीत अवघ्या २४ तासांत चारही संशयितांना ताब्यात घेतले. संतोषची आई आजारी असल्याने पोलिसांनी तिला अद्याप ताब्यात घेतलेले नाही.
 
ग्रामीण पोलिसांच्या तपासावर संशय 
नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अज्ञात संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. मात्र, उगाव येथील रविराज वाघ यांच्या मारेकऱ्यांना निफाड पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे निफाड आणि ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत संशय निर्माण होत आहे. वाघ यांच्या मारेकऱ्यांना मंगळवारपर्यंत अटक झाल्यास निफाड पोलिस ठाण्यासमोर दशक्रिया विधी करण्याचा इशारा नाभिक बांधवांनी दिला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...