आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक जाहीर झाल्यावर... कुसुमाग्रजांचा गहिवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूक जाहीर झाल्यावर 
सावानाचे पाच जण
प. सा.च्या बाहेर भेटले 
अाणि टिपं गाळू लागले 
यशवंतराव म्हणाले, मला केला विषय वादाचा 
साईखेडकर म्हणाले, मला फास दुरवस्थेचा 
मुशं म्हणाले, मी साक्षीदार गाेंधळाचा 
लिमये उद‌्गारले, मी तर फक्त धूलिकणांचा... 
कुसुमाग्रजांनी गळ्यातला गहिवर अावरला 
अाणि ते म्हणाले 
तरी तुम्ही भाग्यवान 
एकेक विषय तरी तुमच्या डाेळ्यापुढे अाहे 
माझ्या डाेळ्यापुढे मात्र खुर्च्या उबवणारी प्रवृत्ती... 
(कुसुमाग्रजांच्या‘ अखेरकमाई’ कवितेवरून...) 
 
मी एक साधा सभासद हाे... सहज परवा प. सा. नाट्यगृहावरून जात हाेताे... तर बारीक कुजबूज एेकू अाली. बघताे तर काय? सार्वजनिक वाचनालयासाठी जिवाचं पाणी केलेले अनेकजण गंभीर चर्चा करत हाेते. त्यातीलच चर्चेचा हा सारांश. मला वाटत हाेतं की, या चर्चेत अापणही सहभागी व्हावं. पण विषय सामान्य सभासद हाच हाेता. मी त्या चर्चेत सहभागी झालाे असताे. तर तात्यांनी माझी केेलेली पूजा मला कधीच अावडली नसती. म्हणूनच मग मी... गुपचूप झाडामागे उभा राहून चर्चा एेकत हाेताे. 
 
चर्चेला सुरुवात झाली ती म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीवरून. तात्या एकदम शांत हाेते. ते हतबल झाल्यासारखे वाटत हाेते. यशवंतराव तात्यांना भेटायला नाशिकला अाले हाेते म्हणून तेही या चर्चेत सहभागी झाले. पण त्यांना एकेक विषय कळू लागल्यावर तेदेखील म्हणाले की, तात्या अापण तर सरस्वतीचे मंदिर उभे केले हाेते. त्यासाठी प्रयत्न केले हाेते. पण इथे तर अापल्यालाच भांडवल करून, वेळ अाली तर जातीचं राजकारण करून यांनी निवडणुकीचा अाखाडाच केला अाहे. तात्या काहीच बाेलेना. त्यांना काय बाेलावं काही सुचतच नव्हतं. 

तेवढ्यात साईखेडकर म्हणाले की, माझ्या पाेराने दिवस-रात्र शेंगा विकून मिळविलेले पैसे या सरस्वतीच्या चरणी अर्पण केले. सांस्कृतिक वैभवसंपन्नता यावी म्हणून त्या सरस्वतीच्या अाशीर्वादाने हे नाट्यगृह उभारले, पण तात्या अाजही अापण प. सा.च्या बाहेर उभे राहूून बाेलताे अाहाेत, यातच सगळे येते. तात्यांनी मिश्कील हास्य केले.
 
साईखेडकर पुढे काही बाेलणार तेवढ्यात मुशं म्हणले की, जाऊद्या साईखेडकर... कशाला हवंय तुम्हाला नूतनीकरण... अहाे नूतनीकरण केल्यावर या लाेकांच्या फक्त मारामाऱ्याच बघायच्या बाकी राहतात. माझे नाव असलेल्या अाणि नुतनीकरण झाल्यावर प्रथमच या सभागृहात झाली. 
 
बघितले ना काय झाले ते. अापली भिंतीला भिंत अाहे... लिमयेंना अाता रहावले नाही... ते खाेचकपणे म्हणाले हाे... हाे... माधवराव मी एेकला ताे गाेंधळ... अहाे पण गाेंधळ का हाेईना वास्तूचा उपयाेग तरी झाला. मला तर या लाेकांनी धुळीत टाकले अाहे.... सावानाशी संबंधित अशा अनेकांनी अापली अवस्था मांडली. अाता सगळेच जण कुसुमाग्रज काय बाेलतात याकडे कान टवकारून बसले हाेते. तात्यांनी गहिवर अावरला... सावानाकडे एक कटाक्ष टाकत ते म्हणाले, तुम्ही भाग्यवानच अाहात... एकेक विषय तरी अाहे तुम्हाला बाेलायला, मला सांगायला... 
 
मी कुठे जाऊ, काेणाला सांगू... माझ्या डाेळ्यापुढे तर फक्त खुर्च्या उबवणारी ही प्रवृत्ती अाहे. त्याचे अाता अापण काय करावे..., सगळे तात्यांना म्हणाले तुम्हीच सांगा तात्या काय करायला हवे... तात्यांनी निवारा या कवितेतील अाेळीच एेकवल्या... ‘जगातल्या साऱ्याच प्रश्नचिन्हांची अंतस्थ इच्छा असते पूर्णविराम हाेण्याची...’ पुढे तात्या अत्यंत शांततेने बाेलू लागले... विषयांना पूर्णविराम लागताे का? प्रवृत्तीला पूर्णविराम लागला पाहिजे... हेच खरे अाहे. अापल्या १७५ वर्षांच्या या मंदिराबाबतही तेच अाहे. अाता तर ताे एक राजकीय अाखाडा हाेऊ पाहत अाहे. एकमेकांवर अाराेप काय? भांडतात काय? धावून जातात काय? न्यायालयातील प्रकरणांच्या फाईली पाहिल्या तर यापेक्षा पुस्तकं कमी असेच वाटते. 
 
कारभार भ्रष्ट हाेताे, पुस्तके व्यवस्थित नाही, काळाबराेबर वाचनालयाने बदल अंगिकारला नाही, अाजही संगणक साेडून हाताने लिखापढी हाेते, अाहे ती संगणक व्यवस्था वादाच्या भाेवऱ्यात अडकवून सभासदांचे नुकसान करतात..., यांना हा अधिकार दिला काेणी? अरे जे न्यायालयात संस्थेलाच अाेढतात तेही निवडणुकीत अाणि जे त्यांच्या विराेधात असतात ते ही निवडणुकीत. यशवंतराव हे तर तुमच्या राजकारणापेक्षा भयानक अाहे. 
 
याद्यांमध्ये मतदारांची नावे नाहीत, संस्थेतील सभासदांना निवडणुकीची परिपूर्ण माहिती दिली जात नाही. मग काय या लाेकांना फक्त खुर्च्या उबवायच्या अाहेत का? सध्याचेच काय तर अाधीचे अाणि येणारेही काय वेगळे करणार? तेव्हा मंडळी अाता तर मतदारांच्याच म्हणजेच अापल्या हातात अाहे की, अापण काेणाला या खुर्च्यांवर बसवायचे अाहे. ज्यांचा साहित्याशी खऱ्या अर्थाने संबंध नाही त्यांना की, सरस्वतीची, संस्कृतीची पूजा करणाऱ्यांना. ही पूजा करता करताच अापलं मंदिरंही पवित्र हाेतं एवढं त्यांना कळू नये... 
 
तात्या अाणखी काही पुढे बाेलणार तेवढ्यात त्यांची नजर झाडामागे लपून एेकत असलेल्या माझ्याकडे गेली... त्यांनी मला जवळ बाेलावले..., नेहमीप्रमाणेच काेण अापण, अामची चर्चा अशी लपून का एेकत हाेता... वगैरे अास्थेेने विचारले अाणि माझ्यासमाेर एकदम तात्यांच्या कणा कवितेतला नायकच उभा राहिला.... अाेळखलंत का सर मला वगैरे.. वगैरे... मनात म्हणून मी त्यांना म्हणालाे, तात्या मी वाचनालयाचा एक साधा सभासद अाहे, वाचनालयाबद्दल मला प्रचंड अास्था अाहे, या वाचनालयासाठी माेठमाेठ्या धुरिणांनी सेवा वाहिली, पण तात्या अाता पहावत नाही हाे... 
 
तुम्ही नका खिन्न, नाराज हाेऊ तात्या... ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...’ तात्यांचा अाशीर्वाद घेतला अाणि निघून अालाे... पण मला माहिती हाेतं की, माझ्या पाठमाेऱ्या मूर्तीकडे पाहून तात्या सहकाऱ्यांना काय म्हणाले, ते म्हणाले... या अनिष्ट प्रवृत्तीला धडा शिकवायला माझा सभासदच पुरेसा अाहे, ताेच विचाराने मतदान करणार अाहे अाणि या मंदिराचे पावित्र्य राखणार अाहे... 
बातम्या आणखी आहेत...