आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणावाचून पक्ष कधीच थांबत नाही- अजित पवार, भुजबळांना अजितदादांचा धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचा सामना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तारू सावरण्यासाठी नाशिकमध्ये अालेले माजी उपमुख्यमंत्री तथा हेवीवेट नेते अजित पवार यांनी काेणावाचून पक्ष थांबत नाही, असे उत्तर देत भुजबळ यांना अलीकडेच पक्षीय कार्यक्रमातून डावलले जात असल्याच्या प्रश्नाला सूचक संदेश दिला. 
 
दरम्यान, मागील काही कार्यक्रमांत भुजबळ यांचे छायाचित्र हाेर्डिंग्जवरून काढल्याबाबत खुलासा करताना त्यांनी जनता वेगळ्या अँगलने विचार करते. त्यामुळेच त्यांचे छायाचित्र काढल्याबाबत अजब स्पष्टीकरणही दिले. 
 
मार्च महिन्यापासून भुजबळ त्यांचे पुतणे समीर हे तुरुंगात अाहेत. त्यानंतर राष्ट्रवादीला जिल्ह्यात उतरती कळा लागली असताना काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळावे घेऊन बांधबंदिस्ती केली.
 
 पवार यांच्या दाैऱ्यात भुजबळ यांचे हाेर्डिंग्जवरील छायाचित्र गायब झाल्यामुळे माेठी टीका झाली. मात्र, पवार यांनी संपूर्ण दाैऱ्यात पक्षातभ्रष्टाचाराच्या मुद्यावरून स्वच्छता माेहीम हाती घेणार असल्याचे सांगत कांगावा करणाऱ्या भुजबळ समर्थकांना धक्का दिला.
 
 या दाैऱ्यानंतर भुजबळ समर्थकांची अस्वस्थता वाढली हाेती. अशातच अजित पवार यांच्या दाैऱ्याकडेही भुजबळ समर्थकांचे लक्ष हाेते. दरम्यान, पत्रकार परिषदेत भुजबळ तुरुंगात असल्यामुळे पक्ष वाऱ्यावर साेडल्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी काेणावाचून पक्ष थांबत नाही, ताे चालतच असताे असे सांगितले.
 
 भुजबळ यांच्या अनुपस्थितीत नाशिकची सूत्रे हाती घेणार काय असे विचारल्यावर त्यांनी अलीकडेच जिल्हानिहाय पालकत्व असे धाेरण रद्द झाले असून, अाता सामुदायिक निर्णयाद्वारे वाटचाल हाेत असल्याचे स्पष्ट केले. 

ग्रामीणमध्ये तालुकानिहाय अाघाडी : जिल्हापरिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची अाघाडी तालुकानिहाय असेल. प्रत्येक तालुक्यात दाेन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. साेलापूरमध्ये अशाच पद्धतीने अाघाडी झाली असून समविचारी पक्षांशी अाघाडी करण्याचे स्पष्ट अादेश देण्यात अाले अाहे. त्यानुसार काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शेकाप-राष्ट्रवादी अशा पद्धतीनेही अाघाडी झाली अाहे. 
 
शेटेंकडे प्रमुख जबाबदारी 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत श्रीराम शेटे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. वडिलकीच्या नात्याने ते निवड मंडळात महत्त्वाचे निर्णय घेतील. 
त्यांना सर्वाेच्च नेते शरद पवार यांनीच जबाबदारी दिल्याचेही सांगत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेली अस्वस्थता कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  
बातम्या आणखी आहेत...