आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अाज हाेणार काेट्यवधींची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  धर्मशास्त्रानुसार वर्षातील जे साडेतीन मुहूर्त मानले जातात, त्यापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून मान्यता असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी शहरात काेट्यवधीचंी उलाढाल हाेणार अाहे. या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक वस्तू अक्षय असते असे मानले जाते, त्यामुळे या मुहूर्ताचे एक वेगळे महत्त्व असून साेने खरेदी, घर खरेदी, गृहप्रवेश, वाहन खरेदीला पसंती दिली जाते. नाेटबंदीनंतरची ही पहिलीच अक्षयतृतीया असल्याने बाजाराला या मुहूर्ताकडून माेठी अपेक्षा अाहे. 
 
घर खरेदीला प्राधान्य 
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील गृहप्रवेश नवीन घराची खरेदीला माेठे महत्त्व अाहे. सध्या शहरात मुबलक प्रमाणात घरांचा पुरवठा उपलब्ध असल्याने दरही रास्त अाहेत. गृहकर्जाचे व्याजदर ८.५ टक्क्यांपर्यंत खाली अालेले असून पंतप्रधान अावास याेजनेंतर्गत लाख ४० हजारांपर्यंतची सबसिडीही मिळविता येत असल्याने गृहस्वप्न साकार करण्यास सध्या चांगला काळ असल्याने गृहखरेदीला नाशिककर पसंती देणार अाहेत. 

मुहूर्तावर साेने खरेदी 
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर साेन्याची मनपसंत खरेदी नाशिककर करत असतात, शहरात गुरुवारी जवळपास २९,४०० रुपये प्रती दहा ग्रॅम साेन्याचा दर हाेता, शुक्रवारी याच दरम्यान साेन्याचे दर राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात अाहे. विशेष म्हणजे सध्या लग्नसराईच्या तारखा असल्याने चाेख साेन्याबराेबरच दागिन्यांची मागणीही अधिक असेल, असे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. 

वाहन खरेदीला पसंती 
येत्याकाही दिवसांत वाहनांच्या किमती सहा टक्क्यांनी वाढणार असल्याची चिन्हे अाहेत, यामुळे अापल्या पसंतीची अावडती कार, माेटारसायकल घरी घेऊन जाण्याकरिता हा एक उत्तम मुहूर्त अाहे. त्यातल्या त्यात काही कंपन्यांकडून मिळत असलेले शंभर टक्क्यांपर्यंतचे अर्थसाहाय्य अाणि अाकर्षक डिस्काउंटस‌्, तत्काळ उपलब्ध असलेली कार माॅडेल्स या मुहूर्तावरील खरेदीला हातभार लावणार अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...