आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयतृतीयेचा मुहूर्त; गृह, वाहन, सुवर्ण खरेदीचा उत्साह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  वाहन विक्रीने टाकलेला टाॅप गियर, साेने खरेदीचा नाशिककरांनी साधलेला मुहूर्त अाणि घर खरेदीला मिळालेला चांगला प्रतिसाद पहाता शुक्रवारी (दि. २८) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शहरात काेट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. मनपसंत वाहनांची त्वरीत उपलब्धता असल्याने जवळपास एक हजार कार, दाेन हजारच्या अासपास माेटारसायकल्सची डिलेवरी मुहूर्तावर दिली गेली तर चाेख साेने अाणि दागिन्यांचीही शहरवासियांनी मनपसंत खरेदी केली. काही काळापासून थंडावलेल्या रिअल इस्टेट व्यवसायालाही या मुहूर्तावर चालना मिळाली असून किमान तिनशे फ्लॅटची नाेंदणी दिवसभरात झाली. 
 
रिअल इस्टेटमध्ये चैतन्य 
घरखरेदी, गृहप्रवेशाला या मुहुर्तावर माेठी पसंती मिळते हे यावर्षीही दिसून अाले. विविध गृहप्रकल्पांत किमान १५० फ्लॅटचे बुकिंग दिवसभरात झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे दाेन वर्षात काहीसा मंद झालेल्या रिअल इस्टेट व्यवसायात या मुहुर्तावर चैतन्य दिसून अाले. 

वाहन खरेदीत २० टक्के वाढ 
शुक्रवारीिदवसभर शहरातील विविध कार वितरक दालने गजबजलेली हाेती. सर्वच कंपन्यांचा विचार करता शहरात या एकाच दिवसात एक हजारच्या अासपास कारची डिलेवरी दिली गेली. गतवर्षाच्या तुलनेत ही २० टक्के वाढ असून कार विक्रीने टाॅप गियर टाकल्याचे पहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश माॅडेल्स तत्काळ उपलब्ध असल्याने ग्राहकांनी अानंद व्यक्त केला. लवकरच कारच्या किंमती टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत मिळाल्याने ग्राहकांनी खऱ्या अर्थाने हा मुहुर्त साधला. माेटारसायकल्सची विक्री दाेन दिवसांत सकारात्मक झाले अाणि दाेन हजारांच्या अासपास माेटारसायकल्सची विक्री अाणि डिलेवरी शहरात दिली गेली. 

साेने झळाळले 
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सराफी पेढ्यांना झळाळी दिसली. शहरात चाेख साेन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम २९,२०० रूपयांच्या अासपास तर दागिन्यांकरीताचा भाव २८,५०० रूपयांपर्यंत हाेता. लग्नसराई सुरू असल्याने ग्राहकांनी दागिने खरेदीला पसंती दिली. राणीहार, नेकलेस, अंगठी, मंगळसूत्र यांसारख्या दागिन्यांना मागणी हाेती. 
 
बातम्या आणखी आहेत...