आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ पक्ष्यांच्या कलाकृतींची भरली अनाेखी ‘शाळा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक- माळढोक,करकोचा, गिधाड, फ्लेमिंगो, टिटवी, बदक, कावळा, चिमणी यांसह दुर्मिळ पक्ष्यांचे संग्रहालय साकारत विद्यार्थ्यांनी जणू निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पक्ष्यांची माहिती जाणून घेतली. निमित्त होते, वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित अनोख्या उपक्रमाचे. 
 
वाय. डी. बिटको शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा काळे यांना उपक्रमशीलतेबद्दल पुरस्कारही मिळाला आहे. हरित सेना उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात जाता यावे, तसेच निर्सगातील दुर्मिळ वनस्पती पक्ष्यांची माहिती या उद्देशाने शाळेत पक्षांचे संग्रहालय साकारण्यात आले आहे.
 
चित्रकार डोमसे यांनी दुर्मिळ पक्ष्यांचे चित्र रेखाटत या ठिकाणी ते मांडण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनीही या उपक्रमाबद्दल कौतुक केले असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही या संग्रहालयास भेट दिली आहे. 
 
दुर्मिळ पक्ष्यांच्या संग्रहालयातून बिटकाे शाळेच्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांची माहिती धडे शाळांमध्ये दिले जात अाहेत. विद्यार्थीही माेठ्या उत्साहाने याचा अानंद घेत अाहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, विविध कलाकृतीचे फोटोज .... 
 
बातम्या आणखी आहेत...