आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे रण : भाजपमध्ये तिकिट विक्रीचा आरोप! पाहा खळबळ उडवून देणारे हे Viral Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पक्षाच्या तिकीटनिश्चितीसाठी भाजप कार्यालयातच दोन लाखांची मागणी उमेदवारांकडे केली जात असल्याच्या व्हिडिओपाठोपाठ आता उमेदवारीसाठी चक्क दहा लाखांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप इच्छुक ज्येष्ठ नेत्यामार्फतच होत असल्याची आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
भाजपच्या तिकिटांचा बाजार मांडला गेल्याचे जे आरोप नाराज वा बंडखोर मंडळींतर्फे होत आहेत, त्याला या व्हिडिओंद्वारे एकप्रकारे बळकटीच मिळत असल्याचे विरोधकांचे म्हणणे असून स्पष्टीकरण देता-देता स्थानिक भाजप नेत्यांची पुरेवाट लागत आहे. दरम्यान, संबंधित व्हिडिओमधील आरोपकर्ते गोपाळ पाटील यांनी मात्र तत्काळ या प्रकाराचे खंडन केले असून, मनसेचे नाशिक संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा व तसे करताना त्यात छेडछाडही केल्याचा आरोप केला आहे.
 
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार असलेल्या भाजपने यादी जाहीर न करताच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तिकीट वाटप सुरू ठेवले हाेते. शुक्रवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत उमेदवारीचा घाेळ सुरूच होता. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने थेट पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह संघटनमंत्री किशाेर काळकर यांनाच अनेकांनी घेराव घातला हाेता. एवढ्यावरच न थांबता एका इच्छुक महिलेने तर माध्यमांसमाेर १० ते २० लाख रुपये घेतल्याचा अाराेप केला होता. तसेच, सिडकाेतील महिला डाॅक्टरनेही त्याची री अाेढली हाेती. यापाठाेपाठ पक्ष कार्यालयात सरचिटणीस नाना शिलेदार यांनी उमेदवारी देताना २ लाख रुपये मागितल्याचा व्हिडिअाे व्हायरल झाला. त्यामुळे अडचणीत अालेल्या पक्षनेतृत्वाने सारवासारव करीत हा प्रचार खर्च असल्याचे सांगितले. हे प्रकरण थांबत नाही ताेच पुन्हा रविवारी सकाळी भाजप कामगार अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष गाेपाळ पाटील यांचाही एक व्हिडिअाे साेशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज पाटील यांनी अामदार फरांदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडताना १० लाख रुपये देऊनही माझे तिकीट कापले.
 
ज्यांचा पक्षाशी कवडीचा संबंध नाही त्यांना उमेदवारी दिली गेली. काय निकष पाळले गेले, असा प्रश्न उपस्थित केला अाहे. तर, त्यांच्यासाेबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तर माजी अामदार वसंत गिते यांच्यावरच टीकेची झाेड उठवित त्यांच्या समर्थकांनाच तिकिटे दिली. यामध्ये सिडकाेतील एकाच भागात राहणाऱ्या नेरकर, जगन पाटील यांच्याही नावाचा नामाेल्लेख करीत अानंदवल्लीतही असाच प्रकार झाला असून, लाेक तुम्हाला जागा दाखवतील. चारही जागा पडतील, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
 
पुढील स्लाइडवर वाचा, आरोप प्रत्यारोप..  अखेरच्या दोन स्लाइड्सवर पाहा व्हायरल झालेले दोन्ही व्हिडीओ..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...