आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतेही दमले, आंदोलन शमले; केवळ आठ छावण्यांना मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट- खुद्द आमदार राहुल मोटे यांच्यासह जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने मंगळवारी २९ पैकी केवळ आठ चारा छवण्यांना मंजुरी दिली असून, आंदोलन करूनही भूम तालुक्यातील संपूर्ण चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेते दमले तरी प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

पूर्वी तालुक्यात ३१ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ३३ हजार जनावरांची सोय झाली. मात्र, मंजुरीशिवाय चालणाऱ्या २९ छावण्यांचे भिजत घोंगडे कायम होते. दरम्यान, छावण्यांना मंजुरी देण्यात अाली असून, संबंधित छावणीचालकांना लवकरच पत्र मिळेल, असे सांगून तहसीलदारांनी अन्य छावणीचालकांनी मार्ग शोधावा, असा सल्ला दिला आहे. भूम तालुक्यात सुमारे ८८ हजार पशुधन आहे. मात्र, चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यातच ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने कडबाही उपलब्ध होत नाही. तीन ते चार वर्षांपासून कडब्यावर चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला होता. यंदा मात्र, हा कडबाही उपलब्ध होणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पशुपालकांतून होत होती. त्यानुसार प्रशासनाने तालुक्यात ३१ चारा छावण्यांना मंजुरी दिली. त्यात भूम, हाडोंग्री ईट येथे प्रत्येकी दोन तर आंद्रुड, निपाणी, आंभी, वालवड, गिरवली, सोन्नेवाडी आदी गावांत चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये तालुक्यातील हजार ६०१ लहान तर २९ हजार ५५३ मोठ्या जनावरांची सोय झाली. परंतु, तालुक्यात लहान मोठे ८८ हजार पशुधन असल्याने बाकीच्या जनावरांच्या चारा- पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता. त्यामुळे मागणीनुसार स्थानिक नेत्यांनी, विविध सामाजिक संघटना, संस्थांनी चारा छावण्या सुरू केल्या असून, समूळ प्रस्तावासह मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी छावण्यांना मंजुरी दिली नाही. परिणामी तालुक्यातील २९ छावण्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होत्या. मंजुरी मिळण्यासाठी आंदोलनही उभारले. प्रशासनाकडे संस्थांनी छावणीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. परंतु, अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी छावण्यांना मंगळवारी मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. उर्वरित २१ छावण्यांचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

११पथकांची नजर : तालुक्यातील३१ छावण्यांना प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. या चारा छावण्यांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने ११ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकास तीन छावण्या देण्यात आल्या असून हाडोंग्री येथील छावणीसाठी एक स्वतंत्र पथक देण्यात आले आहे. या पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी आदींचा समावेश आहे.

आंदोलन तीव्र करणार
संपूर्णनिकषात बसणाऱ्या छावण्यांना मंजुरी मिळावी, यासाठी आंदोलन करूनही प्रशासनाला घाम फुटला नाही. त्यामुळे आणखी तीव्र आंदोलन करणार आहे. ५०० पेक्षा अधिक जनावरे असलेल्या सर्व छावण्यांना मंजुरी द्यावी, अशी आमची मागणी आहे.

दंडामुळे धास्ती
पशुपालकांच्यारेट्यामुळे काही संस्था छावण्या चालवित असल्या तरी त्रुटींमुळे दंड करण्यात येत आहे. दोनवेळा सुमारे कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे छावणीचालक मंजुरी मिळूनही छावण्या सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
२९ छावण्या एक-दीड महिन्यापासून मंजुरी मिळेल, या आशेवर सुरू होत्या. त्यापैकी आठ छावण्यांची दखल घेण्यात आली. मात्र, उर्वरित छावण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाही. तालुक्यात पखरुड, घाटनांदूर येथे प्रत्येकी दोन तर डोकेवाडी, नागेवाडी, पाथ्रुड, उमाचीवाडी, घुलेवाडी, जांबा, दांडेगाव आदी ठिकाणी छावण्या मंजुरीविना सुरू आहेत. या छावणीत सुमारे १५ ते २० हजार जनावरे जगत आहेत.
गरजेनुसार मंजुरी
सध्याभूमतालुक्यात सुरू असलेल्या छावण्या या लोकसहभागातून सुरू आहेत. त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. ज्या ठिकाणी छावणीची गरज आहे, त्याच ठिकाणची परिस्थिती पाहून त्या छावणीला हमखास मंजुरी देण्यात येईल. पाणी, चाऱ्याची सोय पाहून त्या ठिकाणच्या छावणीला परवानगी देण्यात येईल. -डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी.

मार्ग शोधावा
तालुक्यातीलवंजारवाडी, सावरगाव (पाथ.), सावरगाव (दरे.), जाम, आष्टा, उमाचीवाडी, नागेवाडी, घाटनांदूर येथील छावण्यांना मंजुरी दिली आहे. अन्य चालकांनी मार्ग शोधावेत. -अरविंद बोळंगे, तहसीलदार.