आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारकाईने अभ्यास हाच यशाचा मूलभूत पाया, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - प्राध्यापक पदाच्यानोकरीसाठी नेट-सेट ही स्पर्धा अनिवार्य आहे. त्यामुळे पदव्युत्तर वर्षाआधी नेट-सेटबाबतच्या अभ्यासाचे धोरण आपले ध्येय विद्यार्थ्यांनी निश्चित करायला हवे. स्पर्धा परिक्षेत आशावादी दृष्टिकोन महत्त्वाचे आहे. पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यास बारकाईने केल्यास नेट सेटमध्ये यश हमखास मिळते, असे प्रतिपादन प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 
 
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट‌्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ५) ही कार्यशाळा झाली. 
 
या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. वावळे म्हणाले, नेट-सेटमध्ये यश प्राप्त करायचे असेल तर स्वतःचा अभ्यास स्वतः कराल ही शपथ घ्या. कोणत्याही क्लासेसला जाऊन मार्गदर्शन घेण्यापेक्षा आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करा.
 
 नेट-सेट प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पर्यायी झाले असले तरी विषयांतील सखोल ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. याचबरोबर इतर विषयांच्या तज्ज्ञांनी विषयानुसार अभ्यास कसा करावा याच्या काही क्लृप्त्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. सर्व विभागातील वेगवेगळ्या या १७ विषयांचे एकाच वेळी मार्गदर्शन करण्यात आले. 
 
या कार्यशाळेत नेट-सेट प्रथम, द्वितीय तृतीय या तिनही पेपरवर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञांनी यावरील नमुना प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सोबतच नेट-सेट अभ्यासाची माहिती देणारे प्रेझेंटेशनही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला असून, नाशिकसह संगमनेर, सिन्नर, कळवण या भागातूनही विद्यार्थी सहभागी झाले होते. 
 
शहरात अशी कार्यशाळा प्रथमच झाल्याने विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी होती. कार्यशाळेतील मार्गदर्शन बहुमोल ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसमवेत नेट-सेट झालेले प्राध्यापकही सहभागी झाले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, डॉ. विजयकुमार वावळे, डॉ. संजय औटी उपस्थित होते. या कार्यशाळेत भाषा, सामाजिक शास्त्रे, लाइफ सायन्सवर मार्गदर्शन केले गेले. 
 
बातम्या आणखी आहेत...