आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्र संग्रहालयामुळे मराठ्यांचा पराक्रम तळपणार : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘फ्रान्समध्ये एका दुर्गम गावात एक म्युझियममध्ये फक्त एक तलवार हाेती. मात्र, या तलवारीचा इतिहास वाचून एक शाळेकरी मुलगा इतका प्रभावित झाला की पुढे त्याने फ्रान्स विरुद्ध जर्मनी युद्धात फ्रान्सचाचा सरसेनापती म्हणून तलवार गाजवली. त्याचप्रमाणे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाशकात सुरू झालेल्या शस्त्र संग्रहालयामुळे मराठ्यांचा पराक्रम तळपत राहील. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असे संग्रहालय उभारण्याची अापली मनीषा अाहे,’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगळवारी केले.   
या शस्त्र संग्रहालयाचा लाेकार्पण साेहळा मंगळवारी गंगापूर राेडवरील पंपिंग स्टेशन येथे  दिमाखात पार पडला. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. पुरंदरे म्हणाले,  ‘इतिहासाचे दर्शन घडवण्याचे काम अशा संग्रहालयातून हाेत असून त्यास बाळासाहेबांचे नाव देणे म्हणजे त्यांचे स्मरण करणेच अाहे. राज ठाकरे यांच्यासारखा तरुण व हाैशी नेता असेल तर कामे हाेतातच. असेच या संग्रहालयाच्या निमित्ताने म्हणता येईल. या संग्रहालयातील शस्त्रे प्रेरणा देणारी अाहेत. त्यांचे जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच अाहे,’ असे अावाहन त्यांनी केले. 
 
राज ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे असून सर्वत्र भूमिपूजनाचे बार उडत अाहेत. मात्र, एकमेव नाशिक महापालिका हद्दीत सत्ताधारी मनसे मात्र लाेकार्पण, उद‌्घाटन समारंभ पार पाडत अाहे. पुरंदरे  यांच्याकडे असलेल्या अफाट शस्त्रसाठ्यापैकी काही निवडक शस्त्रांचे स्मारक करण्याची कल्पना अापण बाेलून दाखवल्यावर त्यांनी तत्काळ हाेकार दिला. अाता पारंपरिक शस्त्रांचा विषय असल्यामुळे बाळासाहेबांशिवाय अन्य काेणाचे नाव देणार? हे संग्रहालय साकारण्यासाठी वयाच्या ९५ व्या वर्षी सलग चार दिवस तळ ठाेकून स्वत:च्या मनाप्रमाणे शस्त्रांची रचना करण्यासाठी बाबासाहेबांनी कशी धडपड केली,’ हेही ठाकरे यांनी सांगितले.   
असे अाहे संग्रहालय  : या संग्रहालयात इतिहास जागवणारी अनेक पेंटिंग्ज, प्राचिन तलवारी अाहेत. ज्यांच्यावर युद्धात त्या तलवारीचा वापर करून किती शत्रूसैन्य गारद केले त्यांची नाेंद असलेल्या खुणाही अाहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा असून ताे मॅपिंग पद्धतीने चक्क पाहणाऱ्या व्यक्तीसमाेर विचार मांडतानाही दिसेल. केवळ पहिल्या टप्प्यातील संग्रहालयाचे काम झाले असून मार्चनंतर सर्वात महत्त्वाचे व दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...