आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्त हवे... नो टेन्शन, अॅप्लिकेशन आहे तयार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात रुग्णांना रक्त तसेच रक्तदाते मिळणे सोपे व्हावे, या उद्देशाने अर्पण रक्तपेढी जेएसजी प्लॅटिनम यांच्या वतीने ‘अर्पण ब्लड डोनर’ हे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे.
हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड प्रणालीवर आधारित असून, गुगल प्ले स्टोअरवरून सहज विनाशुल्क डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपचे रक्तदानदिनी रविवारी (दि. १४) उद‌्घाटन होणार आहे.

या अॅप्लिकेशनमध्ये फक्त ब्लड ग्रुप शहराचे नाव टाकले की, त्या शहरातील रक्तदात्यांची सूची दिसून येईल. तेथे रक्तदात्याचे नाव, फोन नंबर, पत्ता, शेवटचे रक्तदान कधी केले, याची माहिती दिली जाईल. तेथूनच संबंधित रक्तदात्यास कॉल किंवा एसएमएस करण्याची सुविधा यात आहे. जर काेणाला रक्त द्यावयाचे असेल, तर तेथे नाेंदणी करण्याची सुविधाही आहे.

ज्या योगे गरजू व्यक्ती रक्तदात्यास संपर्क साधू शकतो त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होईल. तसेच, रक्त देताना घ्यावयाची काळजी, कोण रक्तदान करू शकतो आदी माहितीही देण्यात आली आहे. मोबाइल अॅप शुभारंभ सोहळ्यातच अर्पण बुलेटिन अंकाचे प्रकाशन केले जाणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदाते शिबिर संयोजकांचा सत्कारही केला जाणार आहे.
असे अाहे अॅप
रक्तदात्यांची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी या अॅपमध्ये रक्तदात्यांची सूची देण्यात आली असून, त्यात संपर्क क्रमांक आहेत.
अॅप उपयोगी पडेल
- शहरात गरजू रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते, पण त्यावेळी रक्तदाता मिळाल्यास अडचण निर्माण होते. अशावेळी रक्तदात्याची माहिती मिळविण्यासाठी हे अ‍ॅप त्यांना उपयोगी पडू शकते.
डॉ. नंदकिशोर ताथेड, संचालक, अर्पण ब्लड बँक
समस्या तातडीने सुटतील
- जेव्हा रक्ताची गरज भासते, तेव्हा रक्तदात्याचा शोध घेतला जातो. रक्त देणाऱ्यांपर्यंत पोहोचावे कसे, त्यांचे नाव, नंबर कोठून मिळवावे, असा प्रश्न त्यावेळी पडतो. ही समस्या सोडविण्यासाठी हे अॅप तयार केले आहे.
कल्पना पाटणी, अध्यक्षा,जेएसजी प्लॅटिनम