आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्तनरंगातून गुरूंना नमन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सूर,ताल आणि लय यांच्या ‘नर्तनरंगा’तून नमन करत नाशिकच्या कलावंतांनी आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
 
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात नर्तनरंग अकादमीतर्फे नर्तनरंग-गुरुवंदना हा कार्यक्रम झाला. प्रारंभी अकादमीच्या विद्यार्थिनींना कृष्णस्तुती सादर केली. त्यानंतर भूप रागामध्ये नमन सादर करत आपल्या गुरूंना वंदन केले. तसेच, त्यानंतर कवित्त, रास, नटवरी, तराणा, झुला असे वेगवेगळे संगीतप्रकार सादर करून अकादमीच्या विद्यार्थिनींनी गुरूंविषयी आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अकादमीच्या संचालिका प्रेषिता पंडित, विद्या देशपांडे, डॉ. वेदश्री थिगळे, किशोर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. अभिजात अकादमीच्या नृत्यांगना मधुरा जोशी, श्वेता चंद्रात्रे आणि मानसी केळकर यांनीही सादरीकरण केले. पुष्कराज भागवत (संवादिनी), कल्याण पांडे (तबला) यांनी साथसंगत केली. ध्वनिसंयोजन पराग जोशी, प्रकाशयोजना अरविंद भवाळकर यांची होती. 
 
नर्तनरंग कार्यक्रमात शिष्यांनी अापल्या नृत्यसाधनेतून गुरूंना नमन केले. कार्यक्रमातील एक वेधक प्रसंग. 
बातम्या आणखी आहेत...