आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री केजरीवाल मनःशांतीसाठी इगतपुरीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- शहरातील  विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे साेमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनःशांतीसाठी  आले असून, ते या निसर्गरम्य परिसरात १० दिवसीय शिबिरात साधना करणार आहेत. 
 
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याआधीदेखील विविध ठिकाणी विपश्यना केली अाहे. इगतपुरी येथे ते प्रथमच आले आहे.  मुंबई विमानतळावर आल्यानंतर ते मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरीत चार वाजेच्या सुमारास आले. धम्मगिरीच्या वतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील,  रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, सुनील रोकडे उपस्थित होते.


खाेली क्र. ३ मध्ये निवास 
धम्मगिरीत प्रवेश केल्यानंतर केजरीवाल यांनी  व्यवस्थापकांसह चहा घेत २० मिनिटे संवाद साधला. त्यानंतर स्वतः वाहनाकडे जाऊन कपड्यांची बॅग हातात घेत सुरक्षारक्षकांसह धम्मगिरीतील क्र. ३ च्या खोलीत रवाना झाले. या सर्व दौऱ्यात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. २० सप्टेंबरपर्यंत ते येथे साधना करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...