आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापार्क परिसरामध्ये अचानक करणार कोम्बिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  आसारामबापू पुलावर अॅथलेटिक्स प्रशिक्षकावर झालेला प्राणघातक हल्ल्याची पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीर दखल घेतली असून, आसाराम बापू पूल परिसर आणि गोदापार्क येथे दिवसा अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. टवाळखोरांवर धडक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शुक्रवारच्या घटनेनंतर शनिवारी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. 
 
गंगापूररोडवरील गोदापार्क निसर्गरम्य ठिकाण असल्याने सकाळी, सायंकाळी शहरातील बहुतांशी नागरिक कुटुंबीयांसह गोदापार्क परिसरात मोठ्या संख्येने येतात. परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर धावणे आणि विविध खेळांचा सराव करण्यासाठी खेळाडू मुले-मुली येतात. शनिवारी सकाळी दोन टवाळखोर सराव करणाऱ्या मुलींची छेडछाड करत असताना प्रशिक्षक अादीनाथ काळे यांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी काळे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. खेळाडू मुलांनी दाखवलेले धैर्याने दोघा टवाळखोरांना जागेवर पकडणे शक्य झाले. या घटनेची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या संपर्क साधून सुरक्षा वाढवण्याच्या सुचना केल्या होत्या. या सूचनांची अाणि घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. सिंगल यांनी उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांची तातडीची बैठक घेत गोदापार्क आणि आसारामपुल येथे टवाळखोरांवर धडक कारवाईचे आदेश देत परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवत टवाळखोरांवर दंडुका बरसवण्यासह गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गंगापूर आणि म्हसरूळ पोलिसांनी परिसरात नियमित गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले. 

गस्त वाढवली : गोदापार्कपरिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांसह बीट मार्शल आणि सीआर मोबाइल पोलिसांची गस्त परिसरात वाढवण्यात आली आहे. शनिवारी परिसरात पोलिस गस्त वाढवल्याने गोदापार्क परिसरात शांतता होती. टवाळखोरांची संख्या रोडावली होती. 

शांतताभंग करणाऱ्यांची गय नाही 
^गोदापार्क परिसरातशांतताभंग करणाऱ्या टवाळखोरांची गय केली जाणार नाही. ट्रिपलसीट, स्टंटबाजांवर धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
बातम्या आणखी आहेत...