आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेच्या एटीएमवर रांगा, इतरत्र मात्र खडखडाटच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रविवारी बँँकांना सुटी असल्याने नाशिककरांची भिस्त पूर्णपणे प्लास्टिक मनीवरच राहिल्याचे पहायला मिळाले. शहरातील विविध भागात केवळ स्टेट बँकेची एटीएम सुरू हाेती त्यातही बहुतांश दाेनच हजाराच्या नाेटा मिळत हाेत्या. यामुळे या एटीएमवर दिवसभर रांगा लागल्या हाेत्या. इतर राष्ट्रीयीकृत अाणि खासगी बँँकांच्या एटीएमवर मात्र खडखडाट असल्याने बहुतांश एटीएमची शटर्स डाऊन हाेती. रविवार नाशिककरांकरिता शाॅपिंग संडे असताे, त्यामुळे शाॅपिंगकरिता माेठ्या प्रमाणावर क्रेडिट डेबिट कार्डचा वापर हाेत हाेता.
साेमवारी बँँका सुरू राहणार असून अाठवड्यातील पहिलाच दिवस असल्याने बँँकांत गर्दी अधिक असेल, स्टेट बँँकेसह इतर बँँकांनीही ज्येष्ठांसाठी स्वतंत्र काउंटर्स सुरू केले असल्याने पेन्शनर्सला विशेष त्रास हाेणार नसल्याची चिन्हे अाहेत. ज्या बँँकांच्या करन्सी चेस्ट नाशिकमध्ये नाहीत त्यांना इतर बँँकांकडून केवळ एका हाताच्या बाेटावर माेजण्याइतपत लाखांची रक्कम मिळत अाहे. पुरेशी रक्कम मिळत नसल्याने दिवसभराचे कामकाज करणे ग्राहकांना समजावणे अवघड हाेऊन बसले अाहे. त्यामुळे रिझर्व्ह बँँकेकडून अपेक्षित रक्कम विविध बँँकांच्या करन्सी चेस्टला मिळणे अावश्यक अाहे. प्रशासकीय अंदाजानुसार डिसेंबरपर्यंत ही रक्कम मिळण्याची शक्यता अाहे. असे झाले तर मात्र अाठवड्याचे सुरुवातीचे दिवस काही विशिष्ट बँँका वगळता इतर बँँकांकरिता परीक्षेचा काळ ठरणार अाहे.

शहराच्या विविध भागातील एटीएम केंद्र बंद असल्याने केवळ स्टेट बँँकेचेच एटीएम सुरू असल्याने या एटीएमवर नागरिकांनी गर्दी केली हाेती. रविवार असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी क्रेडिट डेबिट कार्डचा वापर केला. वाहनचालकांकडूनही पेट्राेलपंपावर क्रेडिट डेबिट कार्डचा केला जात असून नाेटबंदीच्या निर्णयानंतर या कार्डचावापर वाढू लागला अाहे. या वापरात यापुढे अाणखी वाढ हाेण्याची शक्यता अाहे.
नाेटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून कॅशलेश व्यवहारांचा चालना देण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी विविध बँँकांकडून सुरू करण्यात अालेल्या माेबाइल अॅप्सचा वापर वाढला अाहे. अाॅनलाइन व्यवहाराकडेही नागरिकांचा कल वाढला अाहे.

अाॅनलाइन किराणा खरेदीही वाढली
नाेटबंदी नंतर सुरुवातीचा चलनतुटवडा अाणि सुट्यांची चणचण यामुळे अाॅनलाइन खरेदी डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करून किराणा खरेदी वाढली अाहे. एकुणच बाजारात ४० टक्क्यांच्या अासपास हे प्रमाण असल्याचे घाऊक धान्य किराणा असाेसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.

पेट्राेलपंपांवर वाढले ३० टक्के कॅशलेस व्यवहार; अाणखी वाढ हाेणे शक्य
पाचशे रुपयांची रद्द झालेली नाेट स्वीकारण्याला पेट्राेलपंपांवर शनिवारपासून बंद झाले अाहे. यामुळे क्रेडिट डेबिट कार्डद्वारे इंधन खरेदी वाढली अाहे. नाेटबंदीपासून अातापर्यंत क्रेडिट डेबिट कार्डचा वापर करून इंधन भरण्याचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढले अाहे, रद्द झालेल्या पाचशेच्या नाेटाही स्वीकारणे बंद झाल्याने हे प्रमाण अजून वाढणार असल्याचा अंदाज असल्याचे नाशिक पेट्राे डिलर्स असाेसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...