आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अॅट्रॉसिटी’नुसार कारवाईची चिन्हे, सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत महापालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांच्या ड्रेनेज लाइनमध्ये गुदमरून झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी एम. एस. अॅक्टनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता माहतो तशी करणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांचीही माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वरिष्ठांवर कारवाई
महापालिकेच्याविभागप्रमुखावर जरी गुन्हा दाखल होणार असला, तरीही एम. एस. अॅक्ट २०१३ मध्ये असलेल्या तरतुदींनुसार संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी अर्थात, महापालिका आयुक्तांनाही अप्रत्यक्षरीत्या जबाबदार धरत त्यांच्यावरही कारवाईची तरतूद आहे.