आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: नियोजित शस्त्रक्रिया, उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्ताचा तुटवडा, रुग्णांचे नाहक हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नियोजित शस्त्रक्रिया, उन्हाळ्यामुळे पांढऱ्या पेशींचे कमी होणारे प्रमाण, शालेय सुट्ट्यांमुळे रक्तदात्यांची रोडावलेली संख्या अशा कारणांमुळे शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा निम्म्यावर येऊन ठेपला आहे. परिणामी रुग्णांचे रक्तासाठी अतोनात हाल होत आहेत. अपेक्षित रक्तगटांच्या शोधात रुग्णांचे नातेवाइकही रक्तपेढ्यांच्या खेट्या मारत आहेत. त्यामुळे रक्तपेढ्यांच्या संचालकांवर रक्तसंकलनासाठी मोठे दिव्य पार करावे लागत आहे. 
शहर परिसरात वाढणारे अपघातांचे प्रमाण, शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी अतिरिक्त रक्ताची गरज आणि परीक्षांच्या कालावधीमुळे रक्तसंकलन शिबिरांचे प्रमाण घटले आहे. एप्रिलमध्ये परीक्षा आणि मे महिन्यांत सुट्या यामुळे या दोन्ही महिन्यांत रक्तसंकलन कमी होते. शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे रक्तदान शिबिरे थंडावलेली असतात. उन्हाळा हा आरोग्यासाठी त्रासदायक असतोे. 
 
लग्नसराईचे दिवस आणि शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने बहुतांश कुटुंबीयांनी सहलीचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षांकडून शिबिरांचे नियोजन नसल्याने या सर्व रक्तपेढ्यांना शिबिर घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. शिबिरांमध्ये अवघे पाच ते दहा टक्केच रक्तसंकलन होत असल्याने रक्तपेढ्यांना मागणीपेक्षा साठा कमी पडत आहे. उन्हाळ्यात आपघातांचे प्रमाण वाढते. तसेच, नियोजित शस्त्रक्रियाही केल्या जातात. या सर्वांना रक्ताची मोठी गरज भासत असते. तसेच, वर्षभर जिल्हा रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकेला जननी सुरक्षा अभियानांतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान, रक्तपुरवठा केला जातो. यासह हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यामुळे या दिवसांत रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे रक्तपिशव्यांची टंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्यापर्यंत हीच परिस्थिती राहणार असून, जूनमध्ये त्यात सुधारणा दिसेल, असे शहरातील रक्तपेढ्यांतील संयोजकांचे म्हणणे आहे. 
 
शहरात खासगीसह शासकीय निमशासकीय ब्लड बँका कार्यरत आहेत. या बँकांकडून रक्तसंकलनासाठी नियमित प्रभावी जनजागृती केली जात असली, तरी उन्हाळ्यात मात्र सर्व बँकांना एकेका शिबिरासाठी झगडावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास येत आहे. 
 
‘अर्पण’चे कॉल सेंटर, ब्लड रिसर्च युनिट 
अर्पण ब्लड बँकेने हेल्दी डोनरची वयोगटानुसार माहिती संकलित केली आहे. या रक्तदात्यांना वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी समुपदेशन केले जाते. कॉल सेंटरच्या माध्यमातून सर्वांशी सतत संपर्क साधून रक्तसंकलन केले जाते. समर चॅलेंज उपक्रम नियमित राबवला जात आहे. तसेच, ब्लड रिसर्च युनिट कार्यान्वित झाले आहे. येथे गुंतागुंतीच्या रक्तगटांची तपासणी केली जाते. त्यानुसार रक्तगट दात्यांचा शोध घेतला जातो. 

असामान्यांतील ‘बॉम्बे’ ब्लड ग्रुपचा शोध 
सामान्य असामान्य रक्तगटाप्रमाणे अलिकडच्या काळात बॉम्बे रक्त गट अाढळून आला आहे. या रक्तगटाचे शहरात नागरीक आहेत. मुंबईसह राज्यात २० दाते आहेत. शहरातील या ग्रुपच्या महिलेला रक्ताची गरज भासली होती. त्यावेळी संबंधित रक्तगटाच्या दात्याशी संपर्क साधला असता. एक श्रीलंका, दिल्ली आणि हैदराबाद येथे संपर्क साधून रक्तदान करण्याचे आवाहन केले. सुदैवाने महिलेची प्रसूती नैसर्गिक झाल्याने हा प्रसंग टळला.  

रक्तसंकलनासाठी सूचीनिहाय प्रयत्न 
- रक्तदात्यांच्यासूचीनुसाररक्तसंकलनासाठी बोलावले जाते. त्यातील बहुतांश दाते रक्तदान करतात. उन्हाळ्यात ही संख्याही कमी होते. त्यामुळे उन्हा‌ळ्यात विशेष समर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे.
-डॉ. नंदकुमार ताथेड, अर्पण ब्लड बँक 

रक्तदानाबाबत जनमाणसांत गैरसमज 
रक्तदानाठी अजूनही सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजांमुळे बहुतांश तरुण रक्तदानासाठी पुढे येत नाही. एकाबाजुला सोशल मीडिया विविध उपक्रमांद्वारे प्रभावी जनजागृती होत असली तरीही रक्तदानाबाबत मात्र युवक फारसे गंभीर नसल्याने रक्ताची चणचण भासत आहे. 

सर्वच रक्तगटांची चणचण 
रेड ब्लड सेल्स, व्हाइट ब्लड सेल्स, पीसीव्ही, एसडीपीसी, आरडीपीसी, पीएलए, एचपी, एफएफपी आणि सीआरवायओ अशा वर्गवारीनुसार ए, निगेटिव्ह, एबी-निगेटिव्ह, बी-निगेटिव्ह, निगेटिव्ह, ओ-पॉझिटिव्ह या रक्तगटांचीदेखील गेल्या काही दिवसांपासून चणचण भासत आहे. 

पांढऱ्या रक्तपेशी लाल पेशींचाही भासतोय तुटवडा 
उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पांढऱ्या लाल पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते. या पेशींच्या विलगीकरणासाठी विविध रक्तगटांची अावश्यकता असते. पेशींंची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी रक्तपेढीमध्ये पेशींचा साठा उपलब्ध ठेवला जातो. पांढऱ्या पेशी पाच दिवस जिवंत राहतात. तर, तांबड्या पेशी ठरावीक काळापर्यंत टिकू शकतात. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, रक्तपेढीनिहाय उपलब्ध रक्तसाठा, रक्तपेढ्यांचे हेल्पलाइन नंबर्स आणि अधिकारीर्यांच्या प्रतिक्रिया... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...