आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: डॉ. बळीराम शिंदे यांचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू, गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी हाेते काेठडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणात कारवाई करण्यात आलेले डॉ. बळीराम शिंदे यांचा मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री दीड वाजता डॉ. शिंदे मृतावस्थेत अाढळले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे यांचा मृतदेह धुळे येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केलेल्या डॉ. शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

डाॅ. शिंदे यांनी हाेमिअाेपॅथीचे शिक्षण घेतलले असतानाही ते अॅलाेपॅथीची प्रॅक्टीस करत हाेते. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. गर्भलिंग निदान प्रतिबंध समितीच्या सदस्यांनी डॉ. शिंदे यांच्या मुंबई नाका आणि ओझर येथील हॉस्पिटलवर कारवाई केली होती. डॉ. शिंदे यांच्यावर एमटीपी कायदा, पीसीपीएनडीटी आणि मुंबई शुश्रुषा अधिनियम सुधारित नियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
चार दिवसांपूर्वी डॉ. शिंदे यांनी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 

कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. चार दिवसांपासून ते मध्यवर्ती कारागृहात होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठवण्यात आला आहे. तेथे तहसीलदारांसमोर पंचनामा आणि शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...