आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांची स्थिती अाली पूर्वपदावर, पाचशेची नवी नाेटही दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाेव्हेंबर महिना संपण्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बहुतांश बँकांची स्थिती मागील महिन्याप्रमाणेच पूर्वपदावर अाली अाहे. माेठमाेठ्या तर साेडा, साध्या पाच-दहा लाेकांपेक्षा माेठी रांग कॅश काउंटरवर नसल्याचे चित्र पाहायला मिळत हाेते. शहरवासीयांकडून पंधरवड्यापासून माेठ्या प्रमाणावर मागणी हाेत असलेली पाचशेची नवी नाेटही मंगळवारी शहरातील स्टेट बँक, बँॅक अाॅफ महाराष्ट्रसह काही बँकांच्या शाखांत उपलब्ध झाली, मात्र मर्यादित नाेटा असल्याने दुपारपर्यंत या नाेटा संपल्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले नवे निर्देश सायंकाळी शहरातील बहुतेक बँकांत पाेहाेचले, यानुसार अाता २९ नाेव्हेंबरपासून चलनातील दाेन हजार, पाचशेच्या नव्या नाेटा, शंभर, पन्नास, वीस अाणि दहा रुपयांच्या नाेटा बँक खात्यात भरणा केल्या तर त्यातून रक्कम काढण्यासाठी (विल्ड्राॅल करायला) अाता कुठलीही मर्यादा नाही. मात्र, जुन्या हजार अाणि पाचशे रुपयांच्या नाेटा भरण्याला मात्र मागीलप्रमाणेच अाठवड्याला चाेवीस हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम राहणार अाहे. बँकांत मात्र नाेटांची चणचण असल्याने बँका किती प्रमाणात हे अादेश पाळू शकतील, याबाबत साशंकता पाहायला मिळाली. मात्र, दाेन दिवसांत मुबलक रक्कम मिळेल पाच डिसेंबरपर्यंत बँकिंग सुरळीत हाेईल, अशी शक्यता बँकांच्या काही व्यवस्थापकांनी चर्चा करताना व्यक्त केली अाहे.

एटीएम लवकरच सुरू हाेणार
दाेन हजारानंतर अाता पाचशेचीही नाेट शहरात दाखल झाली अाहे. मंगळवारी काही विशिष्ट बँकांकडेच ही नाेट उपलब्ध हाेती, मात्र दाेन दिवसांत सगळ्याच बँॅकांत ती उपलब्ध हाेईल, ज्यामुळे सुट्या चलनाचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली लागेल. इतकेच नाही तर अनेक बँकांची एटीएम कॅलिब्रेशन्स पूर्ण झाल्याने याच अाठवड्यात बहुतांश एटीएम सुरू झालेले असतील, असे चित्र अाहे.
बातम्या आणखी आहेत...