आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठांकरिता बँकांत स्वतंत्र का‌उंटर्स, पेट्राेलपंपांवरील व्यवहार सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्टेट बँक अाॅफ इंडिया, बँक अाॅफ महाराष्ट्र यांसारख्या शहरातील प्रमुख बँकांच्या शाखांत शनिवारी पेन्शनर्स पगारदारांची गर्दी वाढल्याचे िचत्र हाेते. मात्र ज्येष्ठांकरीता बँकांनी शनिवारी (दि. ३) अनेक ठिकाणी स्वतंत्र काउंंटर्स उघडली हाेती त्यामुळे काहीसा वेळ लागत असला तरी अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागला नाही. स्टेट बँक वगळता इतर बँकांत चलन तुटवड्यामुळे शनिवारी मर्यादेनुसार २४ हजारांची रक्कम उपलब्ध करून देण्यात बँका अपयशी ठरल्या. तर स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे मागणी नाेंदविल्याप्रमाणे २५० काेटीची रक्कम उपलब्ध हाेऊ शकली नाही. मात्र, ही रक्कम मिळेपर्यंत पुरेशी रक्कम हाती असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
दर महिन्याच्या पहिल्या दहा िदवसांत प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांत जमा हाेणारे वेतन अाणि सेवानिवृत्तीवेतन घेण्यासाठी माेठी गर्दी दिसून येते. अशीच गर्दी अाता या महिन्यात सुररूझाली अाहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे मागणी नाेंदविली असून, डिसेंबरपर्यंत १५० काेटींपर्यंत रक्कम हाती पडेल अशी शक्यता अाहे.

साेमवारचा दिवस ठरणार कठीण
अाज रविवारी बँकांना साप्ताहिक सुटी असून, साेमवारी अाठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ताेपर्यंत चलनपुरवठा झाला नाही तर मात्र साेमवारचा दिवस अनेक बँकांना अडचणीचा ठरण्याची शक्यता अाहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष साेय
जिल्ह्यात ३० हजारावर शासकिय कर्मचारी असून यात २८ हजारांच्या अासपास ‘क’ ‘ड’ वर्गातील कर्मचारी अाहेत. या कर्मचाऱ्यांनी बँकात गर्दी करता त्यांची विल्ड्राॅल स्लिप, पासबुकची झेराॅक्स अापल्या विभागप्रमुखाकडे जमा कराव्यात, विभागप्रमुखांनी त्यांच्या पत्रासह या स्लिप बँकेत जमा केल्यास थेट या कार्यालयाकडेच ही रक्कम पाठविण्याची व्यवस्था करण्यात अाली असून यामुळे बँकांत गर्दी कमी हाेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

विदर्भ-ठाण्याकडे वळवली रक्कम
चांदवड येथील एका बँकेच्या चेस्ट ब्रँचमधून ठाणे, नागपूरला रक्कम पाठविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर यापूर्वी मागणी केली की लगेचच दाेन दिवसांत रिझर्व्ह बँक नाशिकच्या बँकांना रक्कम पुरवित हाेती. मात्र, विदर्भातील धान्य अाता बाजारात येऊ लागले असून, तेथील चलनतुटवडा काही प्रमाणात कमी व्हावा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता या भागाला प्राधान्याने रक्कम पाठविली जात अाहे, यामुळे डिसेंबरपर्यंत नाशिकला रक्कम मिळणे मुश्कील असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

करन्सी चेस्ट ब्रँच नसलेल्या बँकांना अडचण
स्थानिक ठिकाणी करन्सी चेस्ट ब्रँच नसलेल्या बँकांना स्टेट बँकेकडून अत्यल्प रक्कम दरराेज मिळत अाहे. यामुळे या बँकांसमाेर अडचणींचा डाेंगर उभा राहिला अाहे. करन्सी चेस्ट असलेल्या बँका अापल्या ग्राहकांना प्रथम प्राधान्य देत असल्याने काही बँकांना तर दिवसाला केवळ दाेन लाख रुपये हाती ठेवण्यात येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...