आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटीनंतर बँकांपुढे सकाळी रांगा; दुपारनंतर परिस्थिती सामान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रविवारी बँका पाेस्टाला असलेल्या साप्ताहिक सुटीमुळे साेमवारी (दि. २१) सकाळी काही काळ नाेटाबदल अाणि रकमा काढण्यासाठी रांगा लागल्या. मात्र, दुपारच्या सुमारास बहुतांश बँकांमध्ये गेल्या अाठवड्याच्या तुलनेत गर्दीचे प्रमाण बरेच घटले. दरम्यान, ‘दिव्य मराठी चमू’ने विविध परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सुमारे साडेपाचशे ग्राहक-नागरिकांचा हा निर्णय अाणि त्यामुळे उद््भवलेल्या परिस्थितीबद्दल कल जाणून घेतला असता ८७ टक्के नागरिकांनी माेदी सरकारने उचललेल्या पावलाचे समर्थन केले. अन्य १३ टक्के लाेकांनी निर्णय चुकला असल्याचे सांगितले, तर ‘निर्णय याेग्य; मात्र यापेक्षा अधिक चांगले नियाेजन करून मगच निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी हाेती’, असा सूर निम्म्याहून अधिक नागरिकांनी व्यक्त केला. रांगेतील ७० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी ते प्रथमच बँकेत अाले असल्याचे सांगितले. अापले खाते असलेल्या बँॅकेतूनच जुने चलन बदलून देण्याच्या निर्णयामुळे बहुतांश बँकांसमाेरील रांगांना अाेहाेटी लागल्याचे चित्र दिसले. काही नागरिकांना हा निर्णय माहिती नसल्याने त्यांना रांगेत उभे राहून काउंटरपाशी पाेहाेचल्यानंतर रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.
अापल्याच बँॅकेतून चलनबदलाचा निर्णय माहीत नसलेल्या काही नागरिकांना रांगेत अर्धा-एक तास उभे राहून काउंटरवर पाेहाेचल्यावर नवीन निर्णयाची माहिती झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. तर, यापूर्वी त्याच बँॅकेच्या अन्य शाखेतून चलन बदलून झाल्यानंतर पुन्हा चलनबदलासाठी अालेल्या ‘डबलगेम’वाल्या नागरिकांचे पितळ काॅम्प्युटरवर उघड झाल्यावर त्यांना तुम्ही यापूर्वीच चलनबदल केल्याने लगेच पुन्हा मिळणार नसल्याचे सांगत बँकांतर्फे माघारी धाडण्यात अाले.

नागरिक प्रथमच आले बँकेत
नागरिक नोटबंदी निर्णयाच्या विरोधात
नागरिक नोटबंदी निर्णयाच्या बाजूने
८७ टक्के
सर्वत्र उपलब्ध झाल्या शंभराच्या नाेटा
प्रारंभीच्याकाळात असलेल्या शंभर रुपयांच्या नाेटांचा तुटवडा अाता बऱ्यापैकी कमी झाला असल्याचे दिसून अाले. नागरिकांना बँकेतून, तसेच एटीएममधूनही शंभरची नाेट उपलब्ध हाेत असल्याने सुट्यांअभावी हाेणारी नागरिक अाणि लहान-माेठ्या विक्रेत्यांची कुचंबणा टळली अाहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेसह अन्य बाजारपेठांमध्येही व्यवहाराची गाडी रुळावर येत अाहे.

बातम्या आणखी आहेत...