आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांचे कामकाज रुळावर, रांगा घटल्या; अाज उद्या मात्र सुटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र सरकारने नाेटबंदीबाबत गुरुवारी रात्री नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रद्द झालेल्या एक हजार पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देणे बंद झाल्याने शुक्रवारी बँकांतील कामकाज अगदी दैनंदिन कामकाजाप्रमाणे रुळावर अाल्याचे चित्र शहरात अनेक बँकांत पाहायला मिळाले. रांगा घटल्याने नियमित बँकिंगकरिता लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत काम हाेत असल्याचा सुखद अनुभव अनेक नागरिकांना अाला. महत्त्वाचे म्हणजे, अाज चाैथ्या शनिवारची तर उद्या रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने दाेन दिवस बँका बंद राहणार अाहेत.
दरम्यान, एटीएमची सेवा अद्यापही सक्षमतेने सुरू झालेली नसली तरी जे काही बाेटावर माेजण्याइतक्या एटीएममध्ये रक्कम उपलब्ध हाेती, त्यावरही कुठे रांगा पाहायला मिळाल्या नाहीत. पेट्राेलपंप, शासकीय रुग्णालये, वीजबिल याकरिता रद्द झालेल्या पाचशे रुपयांच्या नाेटा स्वीकारण्यात येत हाेत्या. शंभर रुपयांच्या नाेटाही चलनात माेठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे सामान्यांची परवड हाेत असल्याचे पहिल्या काही अंशी दुसऱ्या अाठवड्याप्रमाणे चित्र बदलायला सुरुवात झाली अाहे. साेमवारपासून पाचशे रुपयांची नवी नाेटही शहरात चलनात येण्याची शक्यता बँकेच्या सूत्रांनी व्यक्त केली.

अार्थिक चणचणीच्या या काळात ग्राहकांपर्यंत पाेहाेचून त्यांना शंभराच्या नाेटा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या देना बँकेने अाता एटीएम व्हॅन सज्ज केली अाहे. ही व्हॅन अाता शहरातील विविध भागात जाणार असून, ग्राहकांना या वाहनातील एटीएममधून सामान्य एटीएमप्रमाणेच रक्कम काढता येणार अाहे.
हजार आणि पाचशेची नोट चलनातून बंद झाल्यानंतर किरकोळ बाजारात सुट्या पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे सध्या डाळिंबाची आवक कमी असूनही दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी डाळिंबाला प्रति क्रेट १५०० ते १६०० रुपये दर मिळाला. मात्र, चलनबंदीमुळे डाळिंबाच्या दरात किलोमागे १५ ते १६ रुपयांनी घसरण झाली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब मार्केटमध्ये आवक कमी असूनही बाजारात मागणी नसल्याने दरात घसरण झाली आहे. तसेच, परकीय चलन घसरल्याने दरही घसरत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक चिंतातुर झाले आहेत. जोपर्यंत चलनामध्ये शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून आहे.
व्यापारीहीघेताहेत फायदा : चलनातूनहजार आणि पाचशे रुपयांची नोट बंद झाल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. वातावरण आता पूर्ववत होत चालले असले तरी शेतीमालाचे दर पाडून स्वत:चा लाभ करून घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
^नोटबंदीचा परिणामडाळिंबाच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. त्याचप्रमाणे एक्सपोर्टवर परिणाम झाला आहे -ईश्वर गुप्ता, डाळिंब व्यापारी

^गतवर्षीप्रमाणेच यंदाडाळिंबाची आवक सुरू आहे. मात्र, दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. मनोजझाडे, डाळिंब विभागप्रमुख बाजार समिती

^नोटबंदी मुळे किरकोळबाजारातील गर्दी कमी झाली असल्याने दरातही घसरण झाली आहे. सध्या नवे डाळिंब १२० ते १३०, तर जुने डाळिंब १५० ते १६० रुपये किलो विक्री होत आहेत. -अय्याज शेख, डाळिंब विक्रेते
बातम्या आणखी आहेत...