आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीखतांद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा, 60 लाखांची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बांधकाम केलेल्या इमारतीची सातबाऱ्यावर नाेंद न करता त्यातीलच  दोन फ्लॅटचे वेगवेगळ्या नावे खरेदीखत तयार करून नाशिकमधील तीन नामांकित बँकांकडून काेट्यवधींचे कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला आहे. 

विशेष म्हणजे याच बांधकाम व्यावसायिकाने त्याच्याकडे फ्लॅट खरेदी केलेल्या ग्राहकानांही सुमारे ६० लाखांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहेे. याप्रकरणी पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिक शरद पगार आणि त्याची पत्नी कविता पगार यांच्यासह अन्य दाेघांविरुद्ध माेफ्पाअंतर्गत तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अाहे.   कर्ज काढले असतानाही त्याच फ्लॅटचे अनेकांना खरेदीखत करून देत या बांधकाम व्यावसायिकाने शासनासोबतच बँकेचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात मोफ्फा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. या प्रकरणात बँकेच्या पॅनलवरील कायदेशीर सल्लागारांचाही  हात असल्याचे उघडकीस आले आहे.
बातम्या आणखी आहेत...