आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रौर्याला भगव्या रंगातून हिंदुत्वाची स्थापना अशक्य, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मांडले परखड मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भगवे वस्त्र परिधान करून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांकडून कोणी काय खायचे आणि काय खाऊ नये हे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर वेगवेगळ्या कारणांमुळे माणसांना मारलेही जाऊ लागले आहे. क्रौर्याला भगवा रंग देऊन भगव्याची बदनामी सुरू असली तरी त्यातून हिंदुत्व स्थापित होऊ शकत नाही, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. श्री जैन सेवा कार्य समितीच्या वतीने भगवार महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सद्यस्थिती या विषयावर सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले की, हिंदू एक विचारप्रणाली होती. सध्या हिंदुत्व म्हणजे क्रौर्याशिवाय दुसरे काही नाही, असे चित्र पाहावयास मिळत आहे. भगवे कपडे घालण्याची जणू फॅशन आली असून त्यातून हिंदुत्व स्थापित होऊ शकत नाही. हिंदू एक विचार असल्याने तो जागृत ठेवण्याची गरज असून त्याआडून हिंसा, क्राैर्य करणे चुकीचे आहे.
 
महापुरुषांना विशिष्ट धर्माशी जोडले जाऊ लागले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी अॅड. प्रवीण अमृतकर, विद्युलता तातेड, प्राचार्या संगीता बाफना, प्रवीण खाबिया, मोहन लोढा, गौतम सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
पंतप्रधान मोदींना हटवल्यास भाजपचे अस्तित्व संपेल 
राज्यघटनेनुसार पंतप्रधानांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवले जाईल, त्या दिवशी भाजपचे अस्तित्वही संपुष्टात येईल. पंतप्रधान, मुख्यमंत्री ही पदे सत्ताकेंद्रित असतात. पंतप्रधानांना शेजारील राष्ट्राशी संबंध, युद्धाचा निर्णय, अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था यांचे अधिकार असतात. त्यामुळे पंतप्रधानपद पक्षापेक्षाही मोठे असते, असेही सप्तर्षी म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...