आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भानसींना महापाैरपद, प्रथमेश गितेंना उपमहापाैरपदाचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  महापाैर पद रंजना भानसी यांना देण्याचे भाजपच्या गाेटातून जवळपास निश्चित झाले असून, अाता उपमहापाैरपदाच्या उमेदवारीसाठी माजी अामदार वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते यांचे नाव अाघाडीवर अाहे. मात्र, यामुळे भाजपमध्ये अाता जुने-नवे वाद पुन्हा रंगण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. 
 
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अडीच वर्षांच्या महापाैरपदाचे दाेन्ही टप्पे सहज गाठता येणार अाहेत. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जमातीसाठी अारक्षित महापाैरपदासाठी भाजपकडून पाच प्रमुख दावेदार अाहेत.
 
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे अाता महापाैरपदासाठी जमवाजमवीचे अाव्हान राहणार नाही. त्यामुळे भाजपतील महापाैरपदाच्या शर्यतीतील इच्छुकांच्या अाशा-अपेक्षा वाढल्या अाहेत. प्रामुख्याने भाजपत रंजना भानसी, प्रा. सरिता साेनवणे, सुरेश खेताडे, पुंडलिक खाेडे, रूपाली निकुळे हे प्रबळ दावेदार अाहेत. गेल्यावेळी अशाेक मुर्तडक यांच्या रूपात मनसेचा महापाैर झाला हाेता.
 
यंदा महापाैरपदासाठी पंचवटीतील चार दावेदार असल्याने त्यात शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप हे स्वत:चा प्रभाव ठेवण्यासाठी पुन्हा पंचवटीचाच महापाैर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकूणच हालचालींवरून लक्षात येते. अपेक्षेप्रमाणे महापाैरपदासाठी पंचवटीत पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून अालेल्या रंजना भानसी यांचे नाव निश्चित झाल्याचे पक्षातील वरिष्ठांकडून समजते. त्यांना सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता अाहे. 

उपमहापाैर पदासाठी गटबाजी उफाळण्याची शक्यता 
महापाैरपदाचे नाव जवळपास निश्चित झाले असताना उपमहापाैरपदावरून माेठी खलबते सुरू अाहेत. यात ज्येष्ठ नगरसेवकांपैकी संभाजी माेरुस्कर, सतीश कुलकर्णी, अरुण पवार, दिनकर पाटील अादींची नावे चर्चेत असली तरीही या सर्वांना फाटा देत प्रथमेश गिते यांच्या नावाने सध्यातरी अाघाडी घेतल्याचे कळते.
 
मात्र, गिते यांच्या नावामुळे भाजपत गटबाजीदेखील उफाळून येण्याची शक्यता अाहे. या नावाच्या माध्यमातून अामदार देवयानी फरांदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न हाेण्याची शक्यता अाहे. प्रथमच निवडून येणाऱ्याला इतके माेठे पद कसे मिळू शकते, पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांना संधी कधी मिळणार, असे प्रश्न अाता भाजपचे लाेकप्रतिनिधी खासगीत करताना दिसत अाहेत. 
 
स्थायीसह गटनेते पदासाठीही माेर्चेबांधणीला सुरुवात 
महापाैर अाणि उपमहापाैरपदासाठी माेर्चेबांधणी सुरू असताना स्थायी समिती सभापतिपद अाणि भाजपच्या गटनेतेपदासाठीही फिल्डिंग लावली जात अाहे. जवळपास सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी या पदांसाठी प्रयत्नशील अाहेत. उपमहापाैरपद मिळाल्यास संभाजी माेरुस्कर यांच्याकडे भाजपचे गटनेतेपद कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. 
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...