आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाअभियान : चला, अापलं नाशिक पुन्हा स्वच्छ करू या, शहरात दरराेज पडून राहतो 80 टन कचरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छतेच्या बाबतीत देशातील ४३४ शहरांच्या यादीत नाशिक थेट १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळेच शहरात अपेक्षित स्वच्छता हाेत नसल्याचे कारण अाराेग्य विभागाकडून पुढे केले जात आहे. शहरात पसरलेल्या अस्वच्छतेस केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे एकमेव कारण हाेऊ शकते का? राजकीय पदाधिकारी, प्रशासनाची इच्छाशक्ती अाणि नाशिककरांनीही पुरेपूर साथ दिल्यास त्यातून स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा निश्चितच वरचा क्रमांक लागू शकताे, या भावनेने ‘दिव्य मराठी’ अाजपासून ‘स्वच्छ नाशिक : माझी जिद्द, माझा पुढाकार’ हे महाअभियान सुरू करत अाहे. प्रत्येक नाशिककराने यात आपल्यापरीने योगदान दिल्यास निश्चितपणे वर्षभरात आपले नाशिक पुन्हा चकाचक होऊ शकते.
 
नाशिक - भारतातील महापालिकांमध्ये असलेल्या खतप्रकल्पांत नाशिकच्या प्रकल्पाचे अव्वल स्थान असताना दुसरीकडे शहरात दरराेज ८० टन कचरा उचललाच जात नसल्याची विदारक बाब समाेर अाली अाहे. स्वच्छ शहरांच्या यादीत वरच्या स्थानावर मजल मारण्यासाठी या बाबीला महापालिकेच्या कारभाऱ्यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे अाहे.

चाेवीस लाख लाेकसंख्या असलेल्या नागपूरमध्ये दरराेज सुमारे एक हजार मेट्रिक टन कचरा निर्मित हाेताे अाणि हा सर्वच्या सर्व कचरा पालिकेच्या वतीनेउचलला जाताे... २० लाख लाेकसंख्या असलेल्या ठाण्यात ६५० मे. टन कचरा तयार हाेताे अाणि ६२४ मे टन कचरा उचलला जाताे...मिरा भायंदर, वसई विरार, पिंप्री चिंचवड या शहरात जितका कचरा तयार हाेताे तितकाच उचलला जाताे. नाशिकमध्ये माध्ये ४८० मेट्रीक टन कचरा तयार हाेताे. त्यातील ४०० मे टन उचलला जाताे. उर्वरित तब्बल ८० टन तसाच राहताे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी काेट्यवधी रुपये खर्च केला जाताे. त्याचप्रमाणे कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना गेल्या २० वर्षांपासून राबविली जात असतानाही महिन्याला २४०० मेट्रीक टन इतका कचरा उचललाच जात नाही. अशी परिस्थिती याच शहरात बघायला मिळते. सक्षम घंटागाड्यांचा वापर झाल्यास, अाेला अाणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केल्यास अाणि खत प्रकल्पात बंद पडून असलेली यंत्रसामुग्री अाणि मनुष्यबळ वाढविल्यास उर्वरित कमतरताही पूर्ण हाेण्यास मदत हाेणार अाहे. 
 
घनकचरा व्यवस्थापनाची अावश्यकता
- सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे
- १०, ००० लाेकसंख्येमागे २५ सफाई कर्मचारी
- यानुसार अंदाजे ३७०० सफाई कर्मचाऱ्यांची अावश्यकता
- घंटागाडी वाहनांची संख्या वाढविणे
- १०० टक्के कचरा गाेळा करण्याच्या दृष्टीने अंदाजे दैनंदिन २५० घंटागाड्या (२.५ ते ३ टन मतेच्या) कार्यरत असणे अावश्यक
- तंत्रज्ञानाचा वापर - सफाई कर्मचाऱ्यांकरिता सेल्फी अटेंडन्स सिस्टिम व घंटागाड्यांवर जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येऊन गुणवत्तावाढीच्या दृष्टीने प्रयत्न.
 
तुमचा सहभाग महत्त्वाचा
माझी जिद्द - माझा पुढाकार’ या मेगा अभियानात नाशिककरांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार अाहे. यासाठी फक्त एकच करा. जेथे अस्वच्छता असेल वा जेथे कमालीची स्वच्छता असेल तेथील फाेटाे अाम्हाला ९९७५५४७६१६ किंवा ९०२८७०१९७३ या क्रमांकावर पाठवा. निवडक फाेटाेंना प्रसिद्धी दिली जाईल. स्वयंसेवी संस्थांच्या वतीने वा कुणी वैयक्तिकरित्या स्वच्छतेच्या बाबतीत काही उपक्रम राबवित असल्यास त्याचीही माहिती उपराेक्त व्हाॅट‌्सअॅप क्रमांकावर पाठवा. शहरात कुठेही अस्वच्छता दिसल्यास तातडीने अापल्या विभागातील स्वच्छता निरीक्षकांना त्याची माहिती द्या. निरीक्षकांनी त्याची दखल न घेतल्यास ‘दिव्य मराठी’ला त्याबाबत माहिती कळवा. ‘दिव्य मराठी’ त्याचा जोरदार पाठपुरावा करेल.
 
घनकचरा व्यवस्थापन- सद्यस्थिती 
२०६ - एकूण घंडागाड्या
१९०० - एकूण रस्त्यांची लांबी (किलाेमीटर)
९.२२ - किलोमीटर इतक्या अंतराकरिता  एक घंटागाडी कचरा संकलित करते
३,६५,६७० - शहरातील घरांची एकूण संख्या
१७७५ - घरांकरिता एक घंटागाडी कार्यरत
१९९३ - एकूण स्वच्छता कर्मचारी
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- कचरा दिसल्यास संपर्क करा
- घनकचरा व्यवस्थापन विविध शहरांची तुलना...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...