आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारदाराच्या तरुणपणीचा खटला, म्हातारपणी माघार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर कधी निकाल लागेल, हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकत नाही. २० वर्षांपूर्वी असाच एक दुचाकीचोरीचा न्यायालयात दाखल असलेला खटला तक्रारदाराने लोकअदालतीमध्ये मागे घेतला. शनिवारी (दि. ९) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हा खटला निकाली निघाल्याने तक्रारदाराने न्यायव्यवस्थेचे अाभार व्यक्त केले. 
 
१९९७ मध्ये सरदार चौकातील सांडव्यावरची देवी येथील एका कुंकवाच्या दुकानदाराची हिरो होंडा सीडी १०० ही दुचाकी चोरी गेल्याने शेख यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला चोरट्याकडून दुचाकी हस्तगत केली. मुद्देमालासह दुचाकी व्यवस्थित ठेवण्यात अाली. गुन्ह्याचा खटला न्यायालयात पाठवला होता. वर्षभरात न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला दुचाकी परत मिळाली. 

मात्र, न्यायालयात खटला सुरू झाल्याने तब्बल २० वर्षे तक्रारदार हे न चुकता तारखेला हजर रहात होते. संशयित एकाही तारखेला अाल्याने न्यायालयाने वॉरंट काढले होते. शेख यांच्या तरुणपणात सुरू झालेल्या कोर्टाच्या खेट्या म्हातारपणी सुरूच होत्या. तक्रारदार असूनही चुकता ते तारखांना हजर रहात होते. वयामुळे तारखांना जाणे शक्य नव्हते. वर्तमानपत्रातून लोकअदालतीबाबत त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये तक्रारदार शेख यांनी अर्ज दाखल केला. खटला सामोपचाराने मिटवण्यासाठी समोरील व्यक्ती हजर राहणे गरजेचे असते. मात्र, तक्रारदाराने आरोपीबद्दल काही तक्रार नसल्याचे ‘त्यास माफ करावे. दुचाकी मला परत मिळाली अाहे’, असे सांगत खटला मागे घेत असल्याचा अर्ज दिला. लोकअदालतीमध्ये यावर तत्काळ निकाल देत हा खटला निकाली काढण्यात अाला. कोर्टाच्या तारखा थांबल्याने शेख यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी तक्रारदाराचे याबद्दल अभिनंदन केले. 
बातम्या आणखी आहेत...