आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटासाठी २ लाखांची मागणी, नाना शिलेदार यांचा व्हिडिअाे व्हायरल; भाजप अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निष्ठावंतांना घरचा रस्ता अाणि अायारामांसाठी रेड कार्पेट अंथरल्यावरून वादात असलेल्या भारतीय जनता पक्षाची डाेकेदुखी एका स्टिंग अाॅपरेशनमुळे वाढली अाहे. तिकिटासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्याचा नाना शिलेदार यांचा व्हिडिअाे व्हायरल झाल्यामुळे हेच का ‘पार्टी विथ द डिफरन्स’ अशी प्रतिक्रिया साेशल मीडियावर उमटली.

दरम्यान, शिलेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांच्या प्रचार खर्चासाठीच एेपतीप्रमाणे २५ हजारापासून तर लाख रुपयांपर्यंत पैसे पक्षाकडून स्वीकारले जात असल्याचे सांगत त्यात गैर काय, असा सवाल केला.

महापालिका निवडणुकीत भाजपकडे उमेदवारीसाठी यंदा महासागरच उलटला. त्यामुळे यापूर्वी १२२ साेडा, जेथे ५० जागांसाठी उमेदवारांची मारामार हाेती त्या भाजपात सहाशेपेक्षा अधिक इच्छुक जमले. ही गर्दी वाढत असताना अचानक नाना शिलेदार यांच्याकडून एका उमेदवाराला दोन लाख रुपये भरण्याबाबत केलेल्या सूचनेचा व्हिडिअाे व्हायरल झाल्यावर सर्वांनाच हादरा बसला.
बातम्या आणखी आहेत...