आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैर भाजपचाच करण्याचा संकल्प, पालकमंत्र्यांनी दिला निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय जनता पक्षाच्या नाशिकमधील सर्व उमेदवारांच्या झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विजयाचा कानमंत्र दिला. सर्व उमेदवारांनी एकाेप्याने प्रचार करून अधिकाधिक जागा मिळवून भाजपला एकहाती सत्ता मिळवून पुढील महापाैर भाजपाचाच करण्याचाच संकल्पदेखील करण्यात अाला. 
 
भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री रवी भुसारे अाणि शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांच्यासमाेर नूतन उमेदवारांचे अाेळखसत्र झाले. प्रत्येक उमेदवाराने त्याच्या प्रभागासह अापले नाव सांगून मान्यवरांना अापली अाेळख करून दिली. 
 
यावेळी बाेलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारांनी काेणत्याही अफवेला बळी पडता एकत्रितपणे पॅनलचा प्रचार करण्याचे अावाहन केले. तसेच, चाैकसभा घ्याव्यात, स्वतंत्र प्रचार कोणी करू नये, घरोघर जाऊन प्रचार करावा. 
 
नाराज पदाधिकाऱ्यांची मने वळवावीत, आपली बलस्थाने ओळखून प्रचार करावा, कोणालाही दुखवता संभाषण साधावे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रचारासाठी अधिक अधिक वेळ देण्यासाठीचे नियोजन करा शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा, कोणतीही कसूर ठेवू नका, दबाव अथवा धमक्यांना बळी पडू नका.
 
 आपल्या निष्ठेचे फळ आपणास मिळाले असून, व्यवस्थित नियोजनासह निवडणूक जिंकण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय प्रा. सुहास फरांदे अाणि अामदार अपूर्व हिरे यांनीदेखील उपस्थितांना माैलिक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने अादी मान्यवर उपस्थित हाेते. 
 
भाजपच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत पक्षाचे पदाधिकारी. 
केवळ उमेदवारांनाच बैठकीत प्रवेश पक्षाच्या बैठकीसाठी बहुतांश महिला उमेदवार अापापल्या पतींसह अाल्या हाेत्या. मात्र, केवळ उमेदवारांनाच प्रवेश असे सांगून या बैठकीत उमेदवार महिलांच्या पतींनादेखील प्रवेश देण्यात अाला नव्हता. त्यामुळे महिला उमेदवारांसमवेत अालेल्या पतीदेवांना कार्यालयाबाहेरच घुटमळत एकमेकांशी संवाद साधत टाइमपास करावा लागला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...