आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपमध्ये स्वीकृतसाठी अखेरच्या क्षणापर्यंत चढाअाेढ, अाज मुहूर्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपकडून तब्बल अाठ महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला विलंब केला जात असल्यामुळे प्रशासनानेच या निवडीची प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना केल्याने यासाठी साेमवारी (दि. २०) महासभेचा मुहूर्त निश्चित करण्यात अाला अाहे. तरीही भाजपकडून तीन नावे जाहीर करण्यात अाल्याने इच्छूकांमध्ये चढाअाेढ कायम असून अचानक शिक्षण मंडळ नियुक्तीचे वारे वाहू लागल्याने पुन्हा ही प्रक्रिया लांबणीवर पडण्याचीही चर्चा सुरू झाली अाहे. 


महापालिका निवडणूकीत सर्वाधिक इच्छुक भाजप अाणि शिवसेनेकडे असल्याने अनेक प्रभागात उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत अधिकृत उमेदवार निश्चीत हाेत नव्हता. त्यात मातब्बर असलेल्या उमेदवारांना स्वीकृतचे तर काहींना वेगवेगळ्या शासनाच्या अशासकीय समिती सदस्यपदी वर्णी लावण्याचा शब्द देण्यात अाला हाेता. मात्र, प्रत्यक्षात भाजपने एकहाती सत्ता संपादित केल्याने उमेदवारी डावलली गेलेल्या मंडळींचीही नाराजी संपुष्टात अाली अाहे. त्यामुळे स्वीकृतसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी शहरातील तीनही अामदारांच्या तर काहींनी थेट मुख्यमंत्री,पालकमंत्री यांच्याशी संर्पक साधून त्यांच्या गाेटातून अापली वर्णी लावून घेण्यासाठी माेर्चेबांधणी सुरू केली. इच्छूकांमधील या स्पर्धेमुळे दरराेज नवीन नावे पुढे येत गेल्याने पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्ते दुखावले जावू नये, याकरीता चक्क ही प्रक्रियाच गुंडाळून ठेवत लांबणीवर पाडली. शिवसेनेकडून महिला अाघाडी शहराध्यक्ष अॅड. शामला दीक्षित, कार्यालयीन सचिव सुनील गाेडसे यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले असून अनाैपचारिक निवडीची घाेषणा बाकी अाहे. 


भाजपकडून दर महासभेपूर्वी नवीन नावांची चर्चा सुरू हाेते. यापूर्वी माजी शहराध्यक्ष विजय साने, लक्ष्मण सावजी, महिला अाघाडीच्या सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, भारती बागुल, अलका जांभेकर यांची नावे चर्चेत हाेती. ही नावे मागे पडून मध्येच शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, अजिंक्य साने, बाजीराव भागवत, सुनील अाडके, नाना शिलेदार, गाेपाळ पाटील यांच्याही नावांची चर्चा हाेती. त्यात काही नावे पालकमंत्र्याच्या गाेटातून अाल्याने पुन्हा या नावांची चर्चा थांबविण्यात अाली. अखेरीस महासभेच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रशांत जाधव, अजिंक्य साने अाणि भागवत या तीन नावांवर पदाधिकाऱ्यांचे एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी यातील दाेघांना लाेकप्रतिनिधींनी विराेध दर्शविल्याने वाद झाला. यामध्ये संघ परिवाराकडून ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कुलकर्णी उद्याेजकांकडून अाशिष नहार, नीलेश बाेरा यांच्यापैकी एकाचे नाव निश्चीत करण्याचे पक्षश्रेष्ठींकडून अादेश अाल्याने शेवटपर्यंती चुरस राहिली. 


शिक्षण मंडळावर नियुक्तीचा ‘शब्द’ 
स्वीकृत नगरसेवकपदाच्या नावांवर एकमत हाेत नसल्याने एेनवेळी महासभेत भाजपचे नावे जाहीर करता अाणखी मुदत मागवून घेण्याची खेळी खेळली जावू शकते. सत्ताधाऱ्यांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शिक्षण मंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या अाहेत. या मंडळावर वर्णी लावण्याचा शब्द पक्षश्रेष्ठी स्थानिक नेतृत्वाकडून देण्यात येत असल्याने या दाेन्ही नियुक्त्या एकाच वेळी करण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. त्यामुळे महासभेत महापाैर काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...