आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घेराव : भाजप नेत्यांवर पैसे घेतल्याचा अाराेप, शहराध्यक्षांचा काढता पाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिकीट मिळालेल्या इच्छुकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अामदार बाळासाहेब सानप यांनी काढता पाय घेतला. - Divya Marathi
तिकीट मिळालेल्या इच्छुकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अामदार बाळासाहेब सानप यांनी काढता पाय घेतला.
नाशिक - उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या एबी फाॅर्म वितरणाचा घाेळ संपता संपत नसल्याने इच्छुकांनी पक्षनेतृत्त्वावरच थेट पैसे घेतल्याचा अाराेप केला. उमेदवारी मिळाल्याने अाक्रमक झालेल्या काही महिलांनी शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांना घेराव घातल्याने त्यांनी पक्ष कार्यालयातून काढता पाय घेतला. पाच-सहा दिवसांपासून उमेदवारी निश्चितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह लक्ष्मण सावजी, वसंत गिते, अामदार अपूर्व हिरे यांनी इच्छुकांची नाराजी अाेढवू नये, म्हणून प्रक्रियेपासून दूर राहत संघटनमंत्री किशाेर काळकर अामदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे जबाबदारी साेपविली. 

लवाटेनगर येथील महाजन यांच्या निवासस्थानी इच्छुकांनी गर्दी केली. मात्र, वातावरण तणावपूर्ण झाल्याने पालकमंत्र्यांनी सर्व एबी फाॅर्मचे वितरण ‘वसंत स्मृती’ येथे करण्यास सांगितले. त्यामुळे इच्छुकांनी अापला माेर्चा तिकडे वळविला. दुपारी १२ वाजेपासून उमेदवारांचे नाव पुकारून त्यांनाच अात साेडले जात हाेते. या प्रक्रियेलाही विलंब हाेत असल्याने इच्छुकांचा संयम सुटला. प्रभाग १६ मध्ये अनिल ताजनपुरे उज्ज्वला हिरे यांना एबी फाॅर्म दिल्याचे समजताच तेथील इच्छुकांनी अारडाअाेरड केली.

प्रभाग ३० व ३१ मधील इच्छुकांनीही गाेंधळ घातला. काहींनी कार्यालयाचे दरवाजे ठाेठावले. घाेषणाबाजी करीत शहराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांविराेधात थेट पैसे घेतल्याचा अाराेप करीत निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना बाेलून दाखविली. सानप यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा राेष बघता ते निघून गेले. 

सबकुछ सानप, गिते, हिरे : शहराध्यक्ष सानप, माजी अामदार वसंत गिते, अामदार अपूर्व हिरे यांनीच तिकिटे वाटून घेतल्याचा अाराेप करण्यात अाला. 

पैसे अाम्हीही दिले असते... : प्रभाग१४ मध्ये जुने नाशिक मंडल अध्यक्ष अलका मंडलीक यांच्याएेवजी हीना इनामदार यांना तिकीट दिल्याचे समजाताच मंडलीक शाेभा जाधव यांनी ‘मधल्यांनी पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या, तिकिटासाठी पैसेच लागत हाेते तर अाम्हीही काही दिले असते’, असे सांगत १०-२० लाख घेतल्याचा अाराेप केला. मंडलीक काेणाचेच एेकत नसल्याने त्यांना एका खाेलीत नेऊन बाहेरून पदाधिकाऱ्यांनी कडी लावून घेतली. 

अात्मदहनाचाही इशारा.. : प्रभाग३१ मधून इच्छूक असलेल्या शारदा दाेंदे यांनी शहराध्यक्ष सानपांसह इतरांवर तिकिटांसाठी १०-२० लाख रुपये घेतल्याचा अाराेप केला. निवड समिती सदस्यांनी केवळ फार्स केला, पक्षाने विचार केल्यास पक्ष कार्यालयासमाेर अात्मदहन करण्याचा इशारा दाेंदे त्यांनी दिला. 
 
पालकमंत्री, पदाधिकारी फिरकलेच नाही 
तणावाच्या वेळी काेणीही वरिष्ठ अथवा नेहमीच कार्यालय अाणि पक्षाचा ताबा घेणारे पदाधिकारी दिसले नाही. काळकर काही वेळाने अामसार फरांदे यांच्या मदतीने सरचिटणीस पवन भगूरकर, सुजाता करजगीकर, भारती बागुल यांनी खिंड लढविली. सिडकाेतील काही जागंाचा वाद झाला असता अामदार अपूर्व हिरे यांनी स्वत: प्रभाग २४, २५, २८, २९ मधील उमेदवारांचे एबी फाॅर्म बाहेर अाणून दिले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...