आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या गटनेतेपदी संभाजी मोरूस्कर, महापाैरपदी रंजना भानसी, तर उपमहापाैरपदी प्रथमेश गिते यांची नावे जवळपास निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या नाशिकराेड मंडलाच्या वतीने पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात अाला. यावेळी शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांच्यासह उपस्थित पदाधिकारी. - Divya Marathi
भाजपच्या नाशिकराेड मंडलाच्या वतीने पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात अाला. यावेळी शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांच्यासह उपस्थित पदाधिकारी.
नाशिक- भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपदी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे मोरूस्कर यांचा उपमहापौर पदावरचा दावा आता मिटला आहे. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
महानगरपालिकेत निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची गटनोंदणी काल विभागीय आयुक्तालयात झाली.महानगरपालिकेत भाजपचे ६६ सदस्य निवडून आले आहेत. तत्पूर्वी उत्सव मंगल कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
यावेळी महापालिकेच्या भाजप गटनेतेपदी संभाजी मोरूस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली. मी माझी जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडीन, असे आश्वासन गटनेते मोरूस्कर यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले. 
 
विश्वासाला तडा जाऊ देऊ नका : अा. सानप 
शहरवासीयांनीपक्षावर आणि पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले आहे. महानगरपालिकेत भाजपला पसंती दर्शविल्याने नगरसेवकांनी आता नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, शहराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास करताना तो पूर्ण पारदर्शी कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रतिपादन केले. 
 
नाशिकरोड भाजप मंडलाच्या वतीने सोमवारी उत्सव मंगल कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सानप बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नगरसेवकांनी जनतेच्या कामांना आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे पारदर्शी कारभार करावा. तसेच, ज्या भागातून कमी मतदान झाले म्हणुन त्या मतदारांवर अन्याय होता कामा नये.
 
उलट त्या भागात अधिक कामे करुन तेथील नागरिकांचा विश्वास संपादन करावा, असेही यावेळी सांगितले. तसेच, यावेळी भाजपच्या नगरसेवकांची बैठक होवुन यामध्ये सभागृहाच्या गटनेतेपदी संभाजी मोरूस्कर यांची निवड करण्यात आली.
 
यावेळी नाशिकरोड मंडलाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिकरोड मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, प्रकाश घुगे, हेमंत गायकवाड, किरण मैड, सतीश रत्नपारखी, जयश्री गायकवाड, सचिन हांडगे, युनुस सय्यद, जयंत नारद, टिंकू खोले, संजय कोचरमुथा, बाळासाहेब बनकर, मंगेश मोरे, विजय घुले, संजय शिरसाठ आदी उपस्थित होते. 
 
मेळाव्यात गटातटाचे राजकारण : महापालिकानिवडणुकीमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने अनेकांनी निवडणुकीमध्ये छुपे आणि उघडपणे पक्षाच्या विरोधात काम केले होते.
 
त्यामुळे सोमवारी झालेल्या मेळाव्यात ज्यांनी उघड काम केले त्यांनी मेळाव्याला येणे टाळले. तर, पक्षामध्ये केवळ नवीन आणि पैशांने भक्कम असणाऱ्या कार्यकर्त्यांवर वरिष्ठांकडून लक्ष दिले जाते म्हणून अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी केवळ हजेरी लावून काढता पाय घेतला. त्यामुळे भाजप अंतर्गत धुसफूस अद्यापही कमी झाली नसल्याचे दिसून येत होते.
 
विभागीय आयुक्तालयात झाली नोंद : भारतीयजनता पक्षाच्या नाशिकरोड मेळाव्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सर्व नगरसेवकांची नोंद करण्यात आल्याचे जाहीर केले. 
 
रवि किरण घोलप भाजपत 
शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप यांनी यावेळी समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. आमदार बाळासाहेब सानप, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. 
 
गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार 
महापौरपदी रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांची निवड जवळपास निश्चित आहे. मात्र, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने या नावांची अधिकृत घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आलेली नाही. येत्या १४ मार्चला होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. ८) भरण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...