आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टी फंडच्या स्टिंगमुळे भाजप अडचणीत, व्हिडिअाे व्हायरल, हेच का पार्टी विथ डिफरन्स?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुन्या जाणत्या निष्ठावंतांना घरचा रस्ता दाखवणाऱ्या अाणि अायारामांसाठी रेड कार्पेट अंथरल्यावरून अाधीच वादात असलेल्या भारतीय जनता पक्षाची डाेकेदुखी एका स्टिंग अाॅपरेशनमुळे वाढली अाहे. तिकिटासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्याचा नाना शिलेदार यांचा व्हिडिअाे व्हायरल झाल्यामुळे हेच का ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी प्रतिक्रिया साेशल मीडियावर उमटली.
 
दरम्यान, शिलेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांच्या प्रचार खर्चासाठीच एेपतीप्रमाणे २५ हजारांपासून तर लाख रुपयांपर्यंत पैसे पक्षाकडून स्वीकारले जात असल्याचे सांगत त्यात गैर काय, असा सवाल केला. 
 
महापालिका निवडणुकीत केंद्र राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपकडे उमेदवारीसाठी यंदा महासागरच उलटला. त्यामुळे यापूर्वी जेथे १२२ तर साेडा, मात्र जेथे ५० जागांसाठी उमेदवार देण्याकरिता मारामार हाेती त्या भाजपात सहाशेपेक्षा अधिक इच्छुक जमले. अामदार सानप यांच्या प्रभागात चार जागांसाठी दोन लाख रुपयांचा पक्षनिधी मागण्याच्या प्रकारानंतर मनसे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले की, साम-दाम-दंड-भेद वापरून इतर पक्षातले उमेदवार फोडणे आणि वाट्टेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजप करीत अाहे.
 
 या अाजाराचा संसर्ग त्यांच्याच पक्षाच्या मुळावर कसा उठलाय हे नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच केलेल्या स्टिंगमधून उघड झाले अाहे. हा पक्षनिधी असल्याचे पदाधिकारी सांगत असून, त्याचा हिशेब केला तर डाेळे थक्क हाेतील. भाजपकडून ७०० इच्छुक उमेदवार असून, दोन लाखांनुसार गुणाकार केला तर १४ काेटी जमा हाेणार अाहेत. निव्वळ इच्छुकाकडून ही रक्कम घेतली गेली असेल तर ज्यांना तिकिटे दिली त्यांचे अाकडे मती गुंग करणारे असतील. भाजप अामदार सीमा हिरे यांनीच घरचा अाहेर देत पक्षातील कुप्रथावर बाेट ठेवल्यामुळे भाजपचे ‘पार्टी विथ डिफरन्स’चे खरे स्वरूप उघड झाले अाहे. 
 
 
सामूहिक पक्षनिधी 
- निवडणुकीसाठी सभा घेणे, वचननामा तयार करणे किरकाेळ बाबीसाठी माेठा खर्च येताे. त्यामुळे सर्वाकडून एेपतीप्रमाणे पक्षनिधी गाेळा केला अाहे. त्यात गैर काही नाही.
 -बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष तथा अामदार, भाजप 
बातम्या आणखी आहेत...