आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेनेची संघटनात्मक बांधणी समाधानकारक; प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी टाेचले पदाधिकाऱ्यांचे कान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्रात अाणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी पक्षातील प्रत्येक पदाधिकारी अाणि कार्यकर्त्यांची अाहे. प्रत्यक्षात, नाशिक जिल्ह्यात संघटना बांधणीचे काम अपेक्षेप्रमाणे समाधानकारक झालेले दिसत नाही. शिवसेनेच्या तुलनेत ग्रामीण भागात भाजपची स्थिती फारशी चांगली नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांच्या उत्तर महाराष्ट्र अाढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवून त्यांचा राज्य केंद्राच्या कार्यकारिणीतील काही पदांसाठी विचार करावा लागेल, असेही त्यांनी उपराेधिकपणे सांगितले. 


पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने यांच्या उपस्थितीत हाॅटेल राॅयल हेरिटेज येथे उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची अाढावा बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीत दानवे यांनी सुरुवातीस ग्रामीण भागात पक्षाची स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट करून सांगितले की, अापल्यापेक्षा शिवसेना खूप पुढे अाहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दाेन वर्षे उलटूनही काही जिल्ह्यांतील अध्यक्षांपासून तालुका मंडल अध्यक्षांना संघटनात्मक बांधणी करण्यात अपयश अाले अाहेे. ज्यांनी दाेन वर्षे बांधणी केली नाही ते अाता काय बांधणी करणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ३० तारखेच्या अात तालुक्याच्या बैठका घ्याव्यात. जे ३० तारखेपर्यंत हे काम करणार नाही, त्यांना पुणे जळगावच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच पदावरून हटविले जाईल. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत नाशिकइतकी वाईट परिस्थिती मला कुठेच दिसली नाही. येथे महिलांची उपस्थिती अतिशय कमी अाहे. निवडून अालेल्या महिलांची उपस्थिती नाही. हे चित्र बदलण्याची गरज असून महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा. अडचणी साेडविण्यासाठी पालकमंत्र्यांकडे जा. त्यांना तुमच्याकडे येता येत नसेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जा, असा सल्लाही त्यांनी दिला. 


बैठकीस पक्षाचे सरचिटणीस अामदार सुरजितसिंग ठाकूर, रामदास अांबटकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अामदार बाळासाहेब सानप, अामदार सीमा हिरे, अामदार प्रा. देवयानी फरांदे, महापाैर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी, मनपा सभागृहनेता दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांच्यासह नगरसेवक उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित हाेते. 


२५ रुपयांत खासदारकीचे पाच शिक्के 
मेळाव्यातएका पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे शिक्के मिळत नसल्याची तक्रार केली. यावर प्रदेशाध्यक्षांनी शिक्क्यांची वाट बघत बसू नका. अडीच रुपयात शिक्के तयार करून मिळतात. मी २५ रुपयांत खासदारकीचे पाच शिक्के तयार करून घेतल्याचे सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला. 


विस्तारकांना मिळणार माेटारसायकल 
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पूर्णवेळ २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ विस्तारक नेमण्यात अाले अाहेत. या विस्तारकांनी सहा महिन्यांत अापले काम पूर्ण करायचे असून त्यांना पक्षाच्या वतीने त्यांच्याच नावावर माेटारसायकल घेऊन देण्यात येणार अाहेे. नाशिकमधील १५ तालुक्यांसाठी १५ माेटारसायकली मिळणार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...