आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियाने वाचविले चिमुरडीचे प्राण, संदेशानंतर तब्बल पाचशे रक्तदाते सरसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चार वर्षांच्या चिमुरडीला ब्लड कॅन्सर असून तिला बी पाॅझिटिव्ह रक्त उपलब्ध हाेत नाही. रक्त न मिळाल्यास वर्षा अापल्यात राहाणार नाही, असा संदेश फेसबुक अाणि व्हाॅटसअॅपवर पडला अाणि बघता बघता दाेन दिवसांत संबंधित रक्तगट असलेल्या तब्बल दाेनशेपेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व निभावले. इतकेच नाही तर वर्षासाठी अजूनही सुमारे तीनशे रक्तदाते प्रतीक्षेत अाहेत. अाता वर्षाची रक्ताची गरज भागल्यामुळे अन्य गरजू रुग्णांना हे रक्त विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय पाेस्ट टाकणाऱ्यांनी घेतला अाहे. 
 
मालेगाव येथील रहिवासी असलेल्या वर्षा पगारे हिला दर दाेन दिवसांनी बी पाॅझिटिव्ह गटाच्या रक्ताची गरज भासणार अाहे. तिच्यावर सध्या नामकाे हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू अाहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची चणचण अाहे. त्यातच बी पाॅझिटिव्ह हा दुर्मिळ गट असल्याने तिला रक्त मिळते की नाही असा प्रश्न तिच्या पालकांना पडला हाेता. त्यामुळे ते कमालीचे चिंतेत हाेते. ही बाब पंचवटीतील तुषार जगताप, किरण पाटील यांच्यासह काही तरुणांना कळली. त्यांनी वर्षाची भेट घेत परिस्थिती जाणून घेतली अाणि व्हाॅट‌्सअॅप फेसबुकवर ही माहिती व्हायरल केली. रक्तदानाचे अावाहन करताच दाेन दिवसांत चक्क पाचशेपेक्षा अधिक रक्तदाते पुढे सरसावले. एकीकडे साेशल मीडियावर माहिती पुढे पाठविली जात असताना दुसरीकडे किरण काटे, सुलाेचना अाहेर, भूषण खैरनार, श्रीकांत तेजाळे, तुषार शिंदे, महेश अग्रवाल, राेहित कासार यांनी रक्तदान करून वर्षाची तातडीची गरज भागविली. बी पाॅझिटिव्ह रक्तदात्यांबराेबरच अन्य गट असलेल्या दात्यांनीही यासाठी पुढाकार घेतला. 

समताच्या वतीने वर्षाला अायुष्यभर विनामूल्य रक्त 
^समतारक्तपेढीने वर्षाला अायुष्यभर विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली अाहे. याशिवाय तिच्यासाठी अालेल्या दात्यांचे रक्त गरजूंना देण्यात येणार अाहे. अाजवर सुमारे दाेनशे दात्यांनी रक्तदान केले अाहे. तर सुमारे ३०० दात्यांनी रक्तदानाची इच्छा दर्शविली अाहे. -फरान खान, सचिव, समता ब्लड बँक 
 
मुंबईतील अनाथ मुलींचा गट येणार 
वर्षाची माहिती साेशल मीडियावर वाचल्यानंतर मुंबईच्या अनाथ मुलींचा एक गट येत्या शनिवारी (दि. ६) रक्तदानासाठी नाशिकमध्ये येणार अाहे. 

वर्षाच्या निमित्ताने उभी राहिली चळवळ 
वर्षापगारेच्या निमित्ताने साेशल मीडियावर रक्तदानाचे अावाहन करण्यात अाले अाणि बघता-बघता रक्तदात्यांची माेठी फळीच उभी राहिली अाहे. उन्हाळ्याच्या काळात इतक्या माेठ्या प्रमाणात रक्तदान हाेण्याची अशी अपवादात्मक वेळ असते. वर्षाची दाेन महिन्यांची रक्ताची गरज भागली असली तरीही तिच्यासारखे अनेक रुग्ण असतील ज्यांना रक्ताची गरज अाहे. त्यांच्यासाठी अाता रक्तदानाची चळवळ पुढे सुरू ठेवली जाणार अाहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११७३७३७३ किंवा ९५९५९५६७४३. 
बातम्या आणखी आहेत...