आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक परिवहन विभागाची ५६८ वाहनांवर कारवाई, अवैध वाहतूक करणाऱ्यांना दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियम माेडणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने त्वरित कारवाई झाली. - Divya Marathi
नियम माेडणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने त्वरित कारवाई झाली.
नाशिक - विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागल्यानंतर, तसेच रस्त्यांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने डिसेंबरपासून सुरू केलेल्या अभियानांतर्गत पहिल्या दहा दिवसांच्या टप्प्यात ५६८ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या अभियानात शालेय वाहतूक करणारी वाहने, रिक्षा, स्क्रॅप रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, बेकायदेशीर वाहतूक आणि गॅस किट बसवलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. गुरुवार (दि. १५)पासून अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
शहरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीच्या विरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोहीम सुरू करण्यात आली असून, शहरातील विविध भागांत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत शालेय वाहतुकीसाठी जुन्या मारुती व्हॅन, कालबाह्य रिक्षांचा वापर करणाऱ्यांवर, खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन, हेल्मेट-सीट बेल्टचा वापर करणे, अतिवेगाने धोकेदायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई जनजागृती करण्यात येत आहे.

बुधवारी या मोहिमेचा पहिला टप्पा संपला. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात हेल्मेट-सीट बेल्टचा वापर करणे आदींवर जनजागृती करत त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार असल्याचे कळसकर यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन विभागाची ही मोहीम ४० दिवस चालणार असून त्याचा पहिला टप्पा संपला आहे. या मोहिमेसाठी २० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अारटीअाेच्या या माेहिमेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हाेत अाहे.

व्हॉट्सअॅप नंबरवर शंभरहून अधिक तक्रारी
शहरात कुठेही वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून ओम्नीचालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असतील तर त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या ८३२९४०२००२ या व्हॉट्सअॅप नंबरवर गेल्या दहा दिवसांत शंभरहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती कळसकर यांनी दिली.

अवैध वाहतूक नियंत्रित करणार
-अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असून, दहा दिवसांत ५६८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मोहीम ४० दिवस चालणार असून गुरुवारपासून मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
-भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

दोन दिवस होणार जनजागृती
गुरुवारी शुक्रवारी हेल्मेट - सीट बेल्टचा वापर करणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, १७ डिसेंबरपासून कडक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...