आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसचालकाच्या प्रसंगावधानाने सिडकाेत टळला माेठा अपघात, ब्रेक फेल झाल्याने उडाली धांदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- पवननगरकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक त्रिमूर्ती चौक परिसरात फेल झाल्याने तिने एक रिक्षा दोन दुचाकींना धडक दिली. मात्र, बसचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस थांबविण्याचा प्रयत्न करीत वाहकामार्फत प्रवासी रस्त्यावरील नागरिकांना सतर्क केल्याने मोठी दुर्दैवी घटना टळली.

गुरुवारी (दि. १८) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पवननगर-पंचवटी (एमएच १५, एके ८०८३) ही बस पंचवटीकडे निघाली असता, दिव्या अॅडलॅबजवळील दुर्गानगर उतारावर त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाले. चालकाने तत्काळ हा प्रकार वाहकाला सांगितला. त्याने तिकीट काढायचे थांबवून प्रवासी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. तसेच, दरवाजात येऊन बाहेरील वाहनांना बाजूला होण्यास सांगितले. सकाळी एेन वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रस्त्यावरील वाहनचालकांची धावपळ उडाली. पुढे रस्ता दुभाजकाजवळ बस थांबली. मात्र, ती पुन्हा सुरू झाल्याने चालक गडबडला. यातच बस पुढे चालू लागल्याने तिने एक रिक्षा दोन दुचाकींना धडक दिली. त्यात एक महिला किरकोळ जखमी झाली. चालकाने प्रयत्न करून बस सिग्नलजवळ थांबविली.

या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून अनर्थ टाळला. या घटनेनंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गर्दीवर नियंत्रण मिळविले. वाहतूक कोंडी दूर केली.

रस्त्यातवाहने पार्किंग ठरतेय डोकेदुखी : त्रिमूर्तीचौकाच्या अासपास वाहने पार्किंग ही मोठी समस्या ठरते आहे. अनेक दुकानांबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडते. कामटवाडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मिठाई दुकानासमोरील बेशिस्त वाहने पार्किंगबाबत कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
हेल्मेटमुळेच वाचलो

सिग्नलवर उभा असताना मागून आलेल्या बसने धडक दिली. त्यामुळे खाली पडून मी जखमी झालो. बसच्या चाकाखाली आलो असतो; मात्र हेल्मेटमुळे प्राण वाचले. -समाधान हसळकर, अपघातग्रस्तदुचाकीस्वार

त्रिमूर्ती चौकातील दुभाजकाला धडकल्याने बसचे बरेच नुकसान झाले. बसपुढे अालेल्या रिक्षाचा मागचा भाग चेपला गेला.

चालकाचे प्रसंगावधान
ब्रेकफेल झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गिअरवर बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. एकदा तो यशस्वी झाला. त्यानंतर मात्र बस पुन्हा सुरू होऊन पुढे वाहनांना धडकली. मात्र, याही परिस्थितीत त्याने पुन्हा प्रसंगावधान राखून बस नियंत्रणात आणली. या घटनेने त्रिमूर्ती चौक येथील दोन मुलांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटनेची आठवण झाली.

आमचे नशीब बलवत्तर
आईला घेऊन नाशिकरोडला जात होतो. सिग्नलवर उभा असताना अचानक मागून बसने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. आई माझे प्राण वाचले. -अक्षय चव्हाण, अपघातग्रस्त दुचाकीस्वार
बातम्या आणखी आहेत...