आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबल ऑपरेटर्सकडून ३६ लाख रुपयांचा चुना, जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत ८४ हजार ३६९ जोडण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यातकेबल जोडण्यांसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणानंतर महिनाभरात १० हजारांवर जोडण्या वाढल्याचे आढळून आले. अतिरिक्त जोडण्यांची माहिती लपवून केबल ऑपरेटरांनी शासनाला सुमारे ३६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा चुना लावला आहे.

करमणूक शुल्क अधिनियमानुसार केबल जोडण्यांवर शुल्क लागू करण्यात येते. मात्र, बहुतांश केबल ऑपरेटर जोडण्यांबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत नव्हते. पर्यायाने महसुलावर परिणाम होत होता. या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यात केबल जोडण्यांचे सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. दरम्यान, जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत ८४ हजार ३६९ केबल जोडण्या आढळून आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेले संयुक्त शपथपत्र स्थानिक केबल ऑपरेटरांनी स्वत: केलेल्या शपथपत्राद्वारे घोषित केबल जोडण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

चार केबल ऑपरेटरांना सव्वातीन लाखांचा दंड
जिल्हाकरमणूक शुल्क कार्यालयापासून केबल जोडण्यांची माहिती लपवणाऱ्या चार केबल ऑपरेटरांना जिल्हा करमणूक शुल्क अधिकारी विलास हरीमकर यांनी लाख १५ हजार ३७५ रुपयांचा दंड केला आहे. जळगाव येथील भगवान किसन जाधव यांना लाख ६५ हजार ३७५, चाळीसगावचे अशोक फकिरा चौधरी यांना ५० हजार, चाेपड्याचे संजय गजानन पोतदार यांना ५० हजार आणि राजकुमार एस.शर्मा यांना ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला. या चौघांनी ८५९ केबल जोडण्यांची माहिती लपवली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले होते.

दर महिन्याला लाख रुपये कर बुडवला
केबलऑपरेटरांकडून महापालिका क्षेत्रात एका जोडणीला ४५ रुपये, नगरपालिकांच्या क्षेत्रात दर्जानुसार ३० १५ रुपये करमणूक शुल्क आकारण्यात येते. मात्र, सर्वेक्षणानंतर तब्बल १० हजार केबल जोडण्यांची माहिती लपवण्यात आल्याचे आढळून अाले आहे. नगरपालिका क्षेत्रात आकारण्यात येणारे करमणूक शुल्क ३० रुपयांची सरासरी लक्षात घेता दर महिन्याला लाख आणि वर्षाला सुमारे ३६ लाख रुपयांचा चुना केबल ऑपरेटरांनी लावला आहे. त्यानंतरही जोडण्यांची संख्या वाढतच चालली आहे.
अतिरिक्तकेबल जाेडण्या अाढळल्यास ५० हजार दंड
केबलऑपरेटरांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीव्यतिरिक्त केबल जोडण्या आढळून आल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचे आदेशही शासनाने दिलेले होते. या भीतीपोटी जिल्हाभरात १० हजारांवर केबल जोडण्या एकाच महिन्यात वाढल्या आहेत.