आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंब्रिज शाळेचा वाद मिटण्याचे संकेत, इंग्रजी माध्यमांच्या शाळा संघटनेचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक केंब्रिज स्कूलमधील वाद मिटविण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संघटनेने पुढाकार घेतला असून, गुरुवारी (दि. १५) दुपारी वाजता शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या हाेणाऱ्या बैठकीत समेट घडण्याची चिन्हे आहेत. वादाचा फटका शाळेतील साडेचार हजार विद्यार्थ्यांना बसत असल्याचा विचार करून सर्वच बाजूंनी सकारात्मक पावले उचलली अाहेत. 
शाळा प्रशासनाने गुरुवारी(दि. १५) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांनीही या सर्व वादावर पडदा पाडण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली अाहे. वाद संपत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

व्यवस्थापन अाणि काही पालकांतील वादाशी संबंध नसलेल्या साडेचार हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर लवकर ताेडगा निघावा, अशी मागणी पालकांसह शाळा व्यवस्थापनाकडूनही केली जात होती. त्यानंतर बुधवारी (दि. १४) इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संघटनेच्या वतीने या प्रकरणी ताेडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. तसेच, महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष रतन लथ आणि केंब्रिज शाळेच्या पालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, तसेच पालक शाळेच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेण्यास अाधीपासूनच तयार असल्याचे सांगण्यात आल्याने ताेडगा दृष्टिपथात अाला अाहे. तसेच, या प्रकरणात समताेल असा ताेडगा निघाल्यास पालकही ताे मान्य करतील अशी भूमिका त्यांच्या प्रतिनिधींनी घेतल्याने संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. १५) केंब्रिज शाळेत महत्त्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. 

कायदेशीर शुल्क भरायला तयारच.. 
^सर्वप्रथमशाळेनेविद्यार्थ्यांचे पाेस्टाने पाठवलेले दाखले परत पुन्हा घ्यावे. तसेच, शुल्काचा विषय हा न्यायप्रविष्ट असून, डीएफआरसीचा निकाल आल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेले संपूर्ण शुल्क भरायला पालक तयार आहेत. बेकायदा शुल्क सोडून ट्यूशन फी इतर शुल्क भरण्यास अामचा नकार नाही. -योगेश पालवे, पालक 

वाद सोडविण्याचाच अामचा प्रयत्न.. 
^इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संघटनेच्या वतीने गुरुवारी बैठक बोलविण्यात आल्याचे विश्वस्तांना सांगण्यात आले आहे. या वादामुळे विद्यार्थ्यांचे नाहक शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अाहाेत. बैठकीत सकारात्मक तोडगा निघणार आहे. -राहुल रामचंद्रन, विश्वस्त, केंब्रिज स्कूल 
 
बातम्या आणखी आहेत...