आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : GST मुळे कर्कराेगाची औषधी 12 % महागली, काही अाैषधे व त्यांच्या किमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वस्तू अाणि सेवाकर अर्थात जीएसटी देशभरात १ जुलैपासून लागू झाला अाहे. त्यामुळे या महिन्यात दुर्धर अाजार मानल्या जाणाऱ्या कॅन्सरची अाैषधे बारा टक्क्यांनी महागली अाहेत. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर ही अाैषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात अाली हाेती. मात्र, या अाैषधांवर केंद्र सरकारने अाता थेट १२ % जीएसटी अाकारला अाहे.
 
कॅन्सर रुग्णांसह मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या व डायलिसिस करावे लागत असलेल्या रुग्णांनाही इतर औषधांच्या करवाढीचा फटका बसला आहे. ब्लड कॅन्सरसारख्या अाजाराने ग्रस्त रुग्णांना नियिमत गाेळ्या व ब्लड काऊंट वाढण्याची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हिच इंजेक्शन्स डायलिसीसच्या रुग्णांनाही घ्यावी लागतात. याची किंमत एक हजारापासून ४० हजारांपर्यंत हाेती. मात्र, जीएसटी लागू झाल्यानंतर याच अाैषधांच्या किमती १ जुलैपासून १२०० रुपयांपासून ४४ हजार ८०० रुपयांपर्यंत पाेहाेचल्या अाहेत. विशेष म्हणजे, जीवनावश्यक अाैषधांवर कर अाकारणी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटी लागू हाेण्यापूर्वी स्पष्ट केले हाेते. मात्र, जीएसटीमुळे महाराष्ट्र शासनाने अाैषधांना दिलेली करमुक्ती संपली अाहे.
 
उपचार करणे अवघड, खर्चाची चिंता वाढली
- अाैषधांच्या किंमती अशा एका रात्रीत वाढल्याने उपचार करणे अवघड बनले अाहे. अार्थिक बजेटही काेलमडले असून अाधीच विंवचनेत असतांना हा खर्च चिंता वाढविताे अाहे.
-स्वाती, कॅन्सर रूग्णाची पत्नी
 
जीएसटी काैन्सिलने दखल घ्यावी
- कॅन्सरसारख्या अाजारांवर उपचार करत असताना रुग्णाची मानसिकता अाणि उपचारांचा अफाट खर्च याचा विचार करून या अाैषधांवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा कराचे दर शून्य टक्के करणे गरजेचे अाहे.
- उपेंद्र दिनानी, संचालक, डी.विजय फार्मा
 
पुढील स्लाइडवर, काही अाैषधे व त्यांच्या किमती...
बातम्या आणखी आहेत...