आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सदोष हॉल तिकिटांमुळे ‘नीट’ गोंधळ; पालकांचा संताप, विद्यार्थ्यांची धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीट परीक्षेसाठी हाॅल तिकिटांवर झालेल्या चुकांमुळे गाेंधळलेले विद्यार्थी. - Divya Marathi
नीट परीक्षेसाठी हाॅल तिकिटांवर झालेल्या चुकांमुळे गाेंधळलेले विद्यार्थी.
नाशिक - वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (दि. ७) सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत नाशिकमध्ये मोठा गोंधळ उडाला. गैरप्रकार रोखण्यासाठी कडक नियमावली करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नाशिकमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर  परीक्षा केंद्रांचा पत्ता सदाेष असल्याने ऐनवेळी विद्यार्थी व पालकांची परीक्षा केंद्र शोधण्यासाठी मोठी धावपळ झाली. आरटीओ परिसरातील  एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथे परीक्षा केंद्र असताना हॉल तिकिटांवर चक्क इगतपुरीतील मुंडेगावच्या स्कूलचा पत्ता देण्यात आला होता. त्यामुळे अनेक पालक मुंडेगावला गेल्यानंतर त्यांना नाशिकचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. अखेर परीक्षा केंद्रावर वेळेवर रिपोर्टिंग करण्यासाठी पालकांनी मोठी धावपळ करत नाशिकचे केंद्र गाठले.
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मेडिकल व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (दि. ७) नीट अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत परीक्षा असल्याने परीक्षार्थींना ९.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग करणे अनिवार्य होते. शहरातील १९ केंद्रांपैकी आरटीओ कॉर्नर परिसरातील एकलव्य स्कूल या केंद्रावरील ३०० परीक्षार्थींच्या हॉल तिकिटांवर ‘एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल मुंडेगाव, गर्व्हमेंट सर्व्हंट क्वॉर्टर ट्राबल कॉलनी, इन फ्रंट ऑफ न्यू मार्केट, नाशिक’ असा पत्ता देण्यात आला होता. त्यामुळे १५० हून अधिक पालक व विद्यार्थी सकाळी ८ वाजताच मुंडेगावला गेले. पण,  तेथे केंद्र नसल्याचे कळताच संताप अाणि उद्वेगातच त्यांनी तत्काळ नाशिकचे केंद्र गाठले. अखेर या परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी १० ते १०.१५ वाजेपर्यंत अालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रविष्ट करून घेतले. दरम्यान, मुंडेगाव येथे मोठ्या संख्येने पालक येत असल्याने येथील शाळेने बोर्ड लावून नाशिक येथील परीक्षा केंद्रांचा सविस्तर पत्ता दिला होता. 
 
१९ केंद्रांवर १० हजार ५०० परीक्षार्थी प्रविष्ट : शहरातील१९ केेंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १० हजार ५०० परीक्षार्थी प्रविष्ट होते. झूलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी या विषयांवर आधारित १८० प्रश्न होते. मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यात देशभरातून ११ लाख परीक्षार्थी प्रविष्ट होते. या परीक्षेतील गैरप्रकार विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये पेन-पेन्सिलसह घड्याळही नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडही ठरवून देण्यात आला आहे. 
 
 १० मिनिटांचा उशीर, केंद्रीय विद्यालयात प्रवेश नाकारला
देवळाली कॅम्प येथील केंद्रीय विद्यालयातील केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या प्रतिश पवार, पंकज संधान, तेजस येवले यांना केंद्रात येण्यासाठी १० मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात अाला. ९.३० ऐवजी ९.४० वाजता हे विद्यार्थी केंद्रावर पाेहाेचले. केंद्रीय विद्यालयाच्या तीन शाखा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला होता. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना विनंती करूनही प्रवेश नाही मिळाला. एवढेच नव्हे तर स्थानिक नगरसेवकांनाही विनंती केली होती. मात्र, तरीही प्रवेश नाकारण्यात आल्याचे विद्यार्थी प्रतिश पवार याने सांगितले.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...