आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नागरिकांची सुरक्षितता जोपासतानाच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने उपनगर ते नाशिकरोड या परिसरात बसविण्यात आलेल्या ३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे शनिवारी (दि. १५) लोकार्पण करण्यात आले. 
नाशिकरोड परिसरात वर्षभरात आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण रोटरीच्या पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यासाठी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे, रोटरीचे मावळते अध्यक्ष सोमनाथ भट्टड, मावळते सचिव राम अवतार राजपूत, उपप्रांतपाल नाना शेवाळे आदी व्यासपीठावर होते. 

या कार्यक्रमात रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट अध्यक्ष म्हणून काैसर आझाद, तर सचिव म्हणून अजय गुप्ता यांनी पदभार स्वीकारला. खजिनदार म्हणून डॉ. पमिता सुराणा, माधुरी भावे यांनी, तर संचालक म्हणून मधुकर जगताप, अरुण काळे, अॅड. अतुल देशमुख, अॅड. महेश दंदणे, मोहन भावे, डॉ. जितेंद्र सुराणा, दिनेश खांडरे, डॉ. प्रतिभा उप्पलवार, सुदाम पाटील, पंकज अलठक्कर, ऋषिकेश मऱ्हाळकर यांनी पदभार स्वीकारला. दिव्य मराठी रेड एफएम हे कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा, ‘दिव्य मराठी’चे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, डि लिंक कंपनीचे प्रशांत कुलकर्णी, शरद मिश्रा, रमेश मेहेर, मयूर अख्तर, रवी पगारे, आरजे रुद्र उपस्थित होते. 

या वर्षी होणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुरक्षा हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष आझाद यांनी दिली. तसेच, डिजिटल इंडियाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष सोमनाथ भट्टड यांनी त्यांच्या कार्य काळात राबविण्यात आलेल्या २० सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. 

राेेटरीचे उपक्रम सामाजिक बांधिलकीचे : गोडसे 
खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, रोटरीने नाशिकच्या हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत. रोटरी समाज सेवा करणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून समाजाची बांधिलकी म्हणून ते काम करतात. ज्या घटकांपर्यंत शासन पोहोचत नाही, तिथे रोटरी पोहोचत असल्याचे अनेकदा बघण्यास मिळाले आहे. मी माझ्या खासदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...