आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएसअार’मधून तैनात करणार सिग्नलवर कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिग्नल ताेडून भरधाव वेगाने बेशिस्तपणे वाहन दामटण्याच्या प्रकारामुळे अपघातांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेत महापाैर अशाेक मुर्तडक यांनी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे सीएसअार अॅक्टिव्हिटीतून सिग्नलवर कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला अाहे. महापालिका पाेलिस खात्यामार्फत संयुक्तरीत्या पाठपुरावा करून कॅमेरे बसविले जातील त्यातून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईच नाही, तर गुन्हेगारी राेखण्यासाठी मदत हाेईल, अशीही अपेक्षा महापाैरांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख चाैकांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले असून, अपघातांत मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले अाहे. साेमवारी उपनगर नाका येथे झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दाेघांचा मृत्यू झाला हाेता. दरम्यान, गुरुवारीदिंडाेरीराेडवरील तारावालानगर चाैकात सकाळच्या सुमारात प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार बसचालकाने सिग्नल ताेडल्यामुळे ट्रकशी झालेल्या धडकेत विचित्र अपघात झाला वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या बिचाऱ्या चारचाकी चालकाचे दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचल्याचे सांगितले जाते. भरघाव वेगाने चाैक तर साेडा, मात्र सिग्नलची तमा करता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर अाता प्रबाेधनापेक्षा कठाेर कारवाईची गरज अाता व्यक्त हाेत अाहे.

उपनगर नाका चाैकातील सिग्नलच्या मागणीसंदर्भात नगरसेविका सुमन अाेहाेळ विजय अाेहाेळ यांनी तक्रार केल्यानंतर महापाैरांनी सिग्नलवर कॅमेरे लावून नियम ताेडणाऱ्यांविराेधात कठाेर कारवाईचा बडगा उभारण्याचा प्रस्ताव पाेलिस अायुक्तांकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील बेशिस्त वाहनचालकांवरही लगाम लावता येईल. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीलाही अाळा बसेल. त्यासाठी सीएसअार अॅक्टिव्हिटीतून कॅमेरे बसविले जातील. त्याबदल्यात संबंधित कंपनीला जाहिरातीतून उत्पन्न मिळविण्याचा पर्याय दिला जाईल. याबाबत पाेलिस अायुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

महापाैरांमधील पाेलिस जागा
महापाैरअशाेक मुर्तडक हे राजकारणात येण्यापूर्वी पाेलिस खात्यात कार्यरत हाेते. त्यामुळे वाढत्या अपघातांच्या तक्रारी अाल्यावर त्यांच्यातील पाेलिस जागा झाला. चेन स्नॅचिंग, लूटमार अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले अाहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी असे कॅमेरे साहाय्यभूत ठरतील कॅमेऱ्यांच्या खर्चाचा बाेजा पाेलिस पालिकेवर येणार नसल्याने दुहेरी फायदा हाेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...