आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उत्सवांतून जोपासावी सामाजिक बांधिलकी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देता स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाने मतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. 
 
उत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी निभावलेले सामाजिक दातृत्व खरोखर प्रेरणादायी असून, प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील सुप्रसिद्ध मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ. अंजली छाब्रिया यांनी व्यक्त केले. 
 
 
आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘अभिरंग -२०१७’ या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात डॉ. छाब्रिया बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. ‘डिप्रेशन’ हा सर्वव्यापी आजार असून, त्याची समाजात जागरूकता कमी आहे. 
 
डिप्रेशनकडे समाजाचे दुर्लक्ष असून, ही चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संस्थेने ही बाब ओळखली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्येही डिप्रेशन असल्याचे लक्षात येत अाहे. याकरिता शिक्षक आणि विद्यार्थी यांनी याविषयी समुपदेशन करणे गरजेचे असल्याचेही छाब्रिया यांनी सांगितले. 
 
व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, डॉ. नीलिमा चाफेकर, शिक्षणाधिकारी डॉ आर. डी . दरेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाटील उपस्थित होते. मेजर डॉ. जितेंद्र सिंग यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर करून मविप्र व्यवस्थापनाच्या पाठबळामुळे वैद्यकीय महाविद्यालय अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरवीत असून, प्रतिभावंत वैद्यकीय विद्यार्थी तयार करीत असल्याचे सांगितले.
 
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यंदा ‘अभिरंग -२०१७’अंतर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मोफत सर्वरोगनिदान शिबिर घेऊन या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...