आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटीपी प्रकल्पाचा डीपीअार एमअायडीसीकडे हस्तांतरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक मधीलप्लेटिंग अाणि काेटिंग उद्याेगांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणार असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचा सविस्तर व्यवहार्यता अहवाल (डीपीअार) मेटल फिनिशर्स असाेसिएशनने एमअायडीसीकडे हस्तांतरित केला अाहे. निमा हाऊस येथे झालेल्या विशेष चर्चासत्रात हा अहवाल सादर करण्यात अाला असून, एमअायडीसी अाता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार अाहे.
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या निमा हाऊस येथे झालेल्या या चर्चासत्रात व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मेटल फिनिशर्स असाेसिएशनचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सचिव विनायक गाेखले, सीईटीपी समितीचे अध्यक्ष समीर पटवा, महाराष्ट्र अाैद्याेगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी अनंत कुढे, प्रादेशिक अधिकारी अार. यू. पाटील, अायमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, अॅक्वाकेमचे लक्ष्मण पाटील उपस्थित हाेते.
‘निमा’कडून गेल्या दहा वर्षांपासून या प्रकल्पाकरिता प्रयत्न सुरू असून, एमअायडीसीने दाेन एकर जमीनही उपलब्ध करून दिली अाहे. १६ काेटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, त्यात केंद्र शासन ५० टक्के, राज्य सरकारचे प्रदूषण नियंत्रण महामंडळ २५ टक्के तर एमअायडीसी २० टक्के अाणि मेटल फिनिशर्स असाेसिएशनचे सदस्य टक्के असे अार्थिक याेगदान देणार असल्याची माहिती सीईटीपी समितीचे अध्यक्ष समीर पटवा यांनी सुरुवातीलाच दिली. प्रत्येक सदस्यांसह माेठे उद्याेग जे प्लेटिंग अाणि काेटिंगची कामे बाहेरून करवून घेतात, त्यांनीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी असलेल्या उद्याेगांकडूनच ही कामे करवून घ्यावीत यावर जाेर दिला. तर परवानगी नसलेल्या उद्याेगांवर अाम्ही कारवाई सुरू करणार असल्याने ज्यांच्याकडे अशा परवानग्या नसतील त्यांनी त्या त्वरित घ्याव्यात, असे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकल्पाशी निगडित सविस्तर माहिती अॅक्वाकेमचे लक्ष्मण पाटील यांनी पाॅवर पाॅइंटद्वारे उपस्थितांसमाेर मांडले.
सीईटीपीबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन करताना समितीचे अध्यक्ष समीर पटवा समवेत व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मेटल फिनिशर्स असाेसिएशनचे अध्यक्ष शरद कुलकर्णी अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...