आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळ्या ठिकाणी दोन वृद्ध महिलांची सोनसाखळी चाेरीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात दोन ठिकाणी वृध्देंच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करण्याचे प्रकार बुधवारी (दि. २) सकाळी वाजता पंचवटी येथील मंडलिक मळा सकाळी ७.२० वाजता कालिका मंदिरासमोर घडले. याप्रकरणी पंचवटी मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 
याप्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसुम मंडलिक (६२, रा. मंडलिक मळा, अष्टविनायकनगर, पंचवटी) ह्या सकाळी वाजता मंडलिक गणपती मंदिरात दर्शन घेऊन पायी जात असताना दुचाकीवील संशयिताने त्यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी खेचून पलायन केले. तर सकाळी ७.२० वाजेच्या सुमारास माधुरी देशपांडे (६३, रा. गोविंदनगर) या कालिका मंदिरातून दर्शन घेऊन जात असताना याच संशयिताने त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी खेचून पलायन केले. अवघ्या २० मिनिटांतच संशयिताने एक लाख १० हजारांच्या सोनसाखळी चोरी केल्या. पोलिसांनी नाकेबंदी केली, मात्र त्याला पकडण्यात अपयश अाले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...