आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्तीमध्ये वृद्धेची सोनसाखळी खेचली, रविवार कारंजा भागातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- काही दिवसांपासून थंडावलेल्या सोनसाखळीच्या गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाली असून, भरवस्तीमध्ये पायी जाणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी दोघांनी लांबवली. गुरुवारी (दि. ९) सकाळी वाजता पृथ्वीराज निमाणी मंगल कार्यालयाजवळ भरवस्तीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई धाडीवाल (७३, रा. थत्तेनगर, रामवाडी) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पृथ्वीराज निमाणी मंगल कार्यालयाजवळून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केले. 
सकाळी भरवस्तीमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
शहरात दिवसभर नाकेबंदी करण्यात आली होती. मात्र, काही उपयोग झाला नाही. निवडणूक काळात पोलिसांकडून नाकेबंदी कारवाई सुरू होती. काही दिवसांपासून ही कारवाई थंडावल्याने गुन्ह्यांत वाढ झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...