आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील पाच हजार केमिस्टचा ३० मे राेजी संपात सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अखिल भारतीय अाैषधी विक्रेता संघटनेने ३० मे राेजी पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक शहर जिल्ह्यातील सर्वच पाच हजार केमिस्ट सहभागी हाेणार अाहेत. अाॅनलाइन अाैषध विक्री अाणि इ-पाेर्टल नाेंदणीच्या सरकारच्या धाेरणाला विराेध म्हणून ग्राहक हिताच्या दृष्टीने हा बंद पुकारण्यात अाला असून, या दिवशी सकाळी केमिस्ट भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमाेर्चाही काढला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असाेसिएशन ( सेंट्रल झाेन) चे माजी संघटन सचिव याेगेश बागरेचा अाणि नाशिक केमिस्ट असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र धामणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 
 
अाैषध विक्री ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच व्हायला हवी असा कायदा अाहे. अाॅनलाइन अाैषध विक्रीमुळे या कायद्याचेच उल्लंघन हाेणार अाहे. त्याचप्रमाणे झाेपेची, गर्भपात किंवा मानसिक अाजारांची अाैषधे विक्री करताना केमिस्टला खूप काळजीपूर्वक अाणि घेणाऱ्याला संपूर्ण माहिती विचारूनच द्यावी लागतात. अाॅनलाइनमुळे अशा स्वरूपाची अाैषधे एखादा रुग्ण एकाच प्रिस्क्रिप्शनवर अनेकवेळा घेऊ शकताे त्यामुळे त्याच्या अाराेग्याला धाेकापाेहाेचू शकतोे. काही नशेच्या अाैषधांचाही अाॅनलाइनमुळे दुरुपयाेग हाेऊ शकताे, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेसुद्धा अाॅनलाइन अाैषध विक्री घातक असल्याने अाैषधविक्रेत्यांचा विराेध असल्याची भूमिका बागरेचा यांनी मांडली. यावेळी हेमंत पाठक, अतुल अहिरे, मयूर अलई, प्रशांत पवार, गिरीश महाजन, रत्नाकर वाणी, महेश भावसार, मनाेज लाेढा, जगदीश भाेसले अादी उपस्थित हाेते. 

इ-पाेर्टल नाेंदणीलाही विराेध : शासनानेबंधनकारक केलेल्या इ-पाेर्टल नाेंदणीलाही अाैषधविक्रेत्यांनी विराेध केला अाहे. कारण, यामध्ये अाैषध उत्पादकापासून वितरक, सहवितरक, केमिस्ट या सर्वांना एकाच अाैषधाची अाॅनलाइन नाेंद ठेवावी लागणार अाहे. ही बाब अत्यंत किचकट अाहे. याशिवाय ते अाैषध रुग्णाला देणाऱ्या डाॅक्टरांचा नाेंदणी क्रमांक बंधनकारक अाहे. एमबीबीएस त्यावरील शिक्षण घेतलेल्या डाॅक्टरांकडेच असा नाेंदणी क्रमांक असताे. मात्र, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या बीएचएमएस, बीएएमएस पदवी असलेल्या डाॅक्टरांकडे अशी नाेंदणी नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेणार अाहेत. 
 
अत्यावश्यक अाैषधे उपलब्धतेची ग्वाही 
२९मे ला रात्री बारा ते ३० मे ला रात्री बारा वाजेपर्यंत असे चाेवीस तास बंद असेल. दरम्यान, बंदकाळात खूपच अत्यावश्यक असतील अशी अाैषधे असाेसिएशन रुग्ण अाहे त्या परिसरातील सदस्यांच्या दुकानातून उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट करण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...