आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांविराेधात फास एसीबीने अावळले, राष्ट्रवादी नेत्यांची संपर्क कार्यालयाकडे पाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- मनीलाँडरिंगसह इतर अाराेपांच्या गर्तेत अडकून तुरुंगाची हवा खात असलेले माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविराेधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा फास अाणखी अावळण्यास सुरुवात केली अाहे. मुंबई, नाशिकपाठाेपाठ अाता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील मालमत्तांचीही माेजदाद शुक्रवारी सुरू केली.

नाशिक महामार्गावरील दुमजली बंगला, संपर्क कार्यालय या ठिकाणी पथकाने छापा मारून तेथील मालमत्तेची माेजणी सुरू केली. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अाधी एसीबी पथकाने संपर्क कार्यालयाचा ताबा घेतला. मुंबईचे पोलिस उपआयुक्त आवारे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात दहा जणांचा समावेश असून माेजणीसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. पथक संपर्क कार्यालयात अाल्यानंतर त्यांनी भुजबळांचे कार्यकर्ते इतरांना कार्यालयात येण्यास मज्जाव केला. केवळ भुजबळांचे पीए बाळासाहेब लोखंडे बी. आर. लोंढे यांनाच कार्यालयात राहण्याची मुभा दिली. भुजबळ यांच्या बंगल्याची माेजदाद सुरू असताना शहरातील समर्थक, समता परिषद-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मात्र कार्यालयाकडे पाठ फिरवणेच पसंत केले. कार्यालयाबाहेर मोजकेच कार्यकर्ते उभे होते.
बातम्या आणखी आहेत...