आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग फोरमच्या अवयवदान उपक्रमात 750 नाशिककरांनी केली नाेंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेशल नेटवर्क फाेरमतर्फे शिवजयंतीनिमित्त अवयवदान नाेंदणी उपक्रमात सहभागी नाशिककर. - Divya Marathi
साेशल नेटवर्क फाेरमतर्फे शिवजयंतीनिमित्त अवयवदान नाेंदणी उपक्रमात सहभागी नाशिककर.
नाशिक - छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव शहरात विविध संस्था संघटनांतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाताे. यंदा शिवजयंती उत्सवाला सामाजिक जाणिवेची जाेड देत सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून किल्ले रामशेज आणि कॉलेजरोड येथे अवयवदान अर्ज नोंदणी उपक्रम राबविण्यात अाला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ७५० नाशिककरांनी अवयवदान अर्ज नाेंदणी केली. यानंतरही पुढे अवयवदान नाेंदणीचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाणार असल्याचे फाेरमतर्फे सांगण्यात अाले. 
 
शिवजयंतीनिमित्त शहरात धामधूम सुरू असताना सकारात्मक अाणि समजाेपयाेगी उपक्रम राबवून अनाेख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवत सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून शहरात सकाळी अतिशय वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच कॉलेजरोडला लोकप्रबोधन आणि अवयवदान अर्ज भरण्याची मोहीम राबविण्यात अाली. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये अनेक नाशिककरांनी सहभाग घेतला. त्यात महिलांनीही सहभाग नाेंदवला. याशिवाय, ज्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज भरणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 
यापुढेही ही माेहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्णय फाेरमने घेतला अाहे. नाशिकमध्ये ७०० पेक्षा जास्त नागरिकांनी अवयवदान नोंदणी एका दिवसात केली. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून ही मोहीम पुढे नेण्यात आली. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. या मोहिमेच्या नियोजनासाठी प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, डॉ. उत्तम फडताळे, रामदास शिंदे यांनी परिश्रम घेतले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...